Sunday, June 7, 2026
Latest NewsLIFESTYLE

मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेत श्रेया मुटकुरे आणि माधवी पानसरे मानकरी

३६ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये संपन्न झालेल्या मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेत २३ ते ४० वर्षे वयोगटात श्रेया मुटकुरे व ४१ ते ५५ वर्षे वयोगटात माधवी पानसरे या प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरल्या. २३ ते ४० वर्षे वयोगटात तृप्ती राठोड आणि श्रद्धा सावेकर आणि  ४१ ते ५५ वर्षे वयोगटात शजादी सय्यद आणि गीतांजली थोरात यांनी त्यांच्या गटात अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तसेच अमृता कदम आणि दक्षा जाखडी या बेस्ट पर्सनॅलिटीच्या मानकरी ठरल्या. रवि बाला काकतकर, मिडास टच इन्स्टिट्यूटच्या डॉ. अंजली जोशी आणि अभिनेते कबीर सिंग यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाची सुरुवात धनश्री जोगळेकर यांच्या गणेश वंदनाने झाली.

मिसेस पुणे फेस्टिव्हल ही विवाहित महिलांची सौंदर्य, व्यक्तिमत्व व बुद्धिमत्ता स्पर्धा बालगंधर्व रंगमंदिर येथे आज पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन लायन्स कोथरूडचे अभय शास्त्री, संयोजिका अॅड. अमृता जगधने, मोहन टिल्लू यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.  पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अभिनेते कबीर सिंग व मोहन टिल्लू यांनी विजेत्या महिलांना मुगुट प्रदान केले. याप्रसंगी सहसमन्वयक अर्चना सोनावणे, मिस पुणे फेस्टिव्हलच्या संयोजिका सुप्रिया ताम्हाणे, नृत्य स्पर्धेच्या संयोजिका संयोगिता कुदळे, अतुल गोंजारी आणि श्रीकांत कांबळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन मराठी बाना या मलिकेतिल कलाकर प्रतीक कदम यांनी केले. या कार्यक्रमास महिलांनी मोठी गर्दी केली होती.

या स्पर्धेत २३ ते ४० व ४१ ते ५५ वर्ष असे दोन वयोगट होते. २०० हून अधिक विवाहित महिलांनी यात भाग घेतला होता. यांच्या पहली फेरीतून प्रत्येक गटातील प्रत्येकी १२ महिलांची निवड करण्यात आली. त्यात टॅलेंट, स्वपरिचय व प्रश्नोत्तरे अशे फेऱ्या होत्या. यातून एक विजेती व दोन उपविजेत्या यांची निवड दोन्ही गटातून करण्यात आली. योगेश पवार यांनी स्पर्धकांची कोरिओग्राफी केली होती.

या कार्यक्रमात सुरज डान्स अकादमीच्या महिलांनी नृत्य सादर केले.

या कार्यक्रमाचे प्रायोजक जोयालुक्कास ज्वेलर्स होते. गिफ्टिंग पार्टनर विजय वल्लभ सारीजच्या मोनिका जैन, व्ही राधा ब्रँडच्या मृणाल इनामदार, मेकअप स्पॉन्सरर ब्लेझ अकादमीच्या स्मिता देव, फूड पार्टनर राजेशाहीचे निलेश धमिस्ते होते.

३६व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचालनालय आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून, पंचशील, सुमा शिल्प लि., भारत फोर्ज आणि नॅशनल एग्ज को–ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, बढेकर ग्रुप,अहुरा बिल्डर्स आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading