Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अजित पवार गटाचे वीस मतदारसंघातील संभाव्य उमेदवार निश्चित

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वीस मतदारसंघातील संभाव्य उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. बारामती मतदारसंघातून खुद्द अजित पवार हेच रिंगणात उतरणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या अंतर्गत बैठकीत संभाव्य उमेदवारांबाबत निर्णय घेण्यात आला. 

विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. महायुतीच्या घटकपक्षांमधील जागावाटपाचे सूत्रही अद्याप निश्चित झालेले नाही. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 20 जणांची संभाव्य उमेदवारी पक्षांतर्गत बैठकीत निश्चित करण्यात आली आहे. अर्थातच हे सर्व मतदार संघ सध्याही अजित पवार गटाकडेच असून बहुतेक मतदारसंघात प्रस्थापितांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

पक्षाच्या अंतर्गत बैठकीत बारामती- अजित पवार, येवला- छगन भुजबळ आंबेगाव– दिलीप वळसे-पाटील, परळी– धनंजय मुंडे, कागल- हसन मुश्रीफ, दिंडोरी– नरहरी झिरवळ, रायगड– अदिती तटकरे, अहमदनगर– संग्राम जगताप, खेड– दिलीप मोहिते-पाटील, अहेरी- बाबा अत्राम, कळवण- नितीन पवार, इंदापूर– दत्ता भरणे, उदगीर- संजय बनसोडे, पुसद– इंद्रनील नाईक, वाई खंडाळा महाबळेश्वर– मकरंद आबा पाटील, पिंपरी– अण्णा बनसोडे, मावळ– सुनील शेळके, अंमळनेर- अनिल पाटील, जुन्नर– अतुल बेनके आणि वडगाव-शेरी– सुनील टिंगरे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading