‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज होणार एलिमिनेशन; कोणाला मोदक, कोणाला नारळ मिळणार?
Bigg Boss Marathi Day 42 : ‘बिग बॉस मराठी’चा हा आठवडा खूपच कठीण होता. या आठवड्यातील सर्व टास्क सदस्यांना हादरवणारे होते. आज बिग बॉस मराठीच्या घरात एलिमिनेशन पार पडणार आहे. या एलिमिनेशनमध्ये काय होणार हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. या आठवड्यात पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सात सदस्यांपैकी कोणाचा प्रवास आज संपणार हे पाहावे लागेल.
बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात कोण राहणार आणि कोणाचा खेळ संपणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणत आहे,”आता होणार आहे एलिमिनेशन. ज्यांना मोदक मिळतील ते सेफ होतील. ज्यांना नारळ मिळणार ते या घरातून निरोप घेणार”. त्यानंतर घरातील एका सदस्यांला रितेश भाऊ म्हणतोय,”तुमचा प्रवास आज इथे संपतोय”.
‘बिग बॉस’च्या घरात आज एलिमिनेशन होणार आहे. यात कोणाला मोदक मिळणार आणि कोणाला नारळ मिळणार हे जाणून घेण्यास बिग बॉसप्रेमी उत्सुक आहेत. घन:श्याम दरवडे, निक्की तांबोळी, आर्या जाधव, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अरबाज पटेल या सात जणांमधून एकाचा प्रवास आज संपणार आहे.
‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BhauchaDhakka
