“अरबाज आहे मोठा पलटीबाज”; भाऊच्या धक्क्यावर अभिजीत रोखठोक बोलला
Bigg Boss Marathi Day 42 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची समीकरणं अनेकदा बदललेली पाहायला मिळत असतात. या आठवड्यात अरबाजने घेतलेली पलटी घरातील सदस्यांना खटकली आहे. मागचा भाऊचा धक्का झाल्यानंतर अरबाजने एका क्षणात पलटी मारली होती. घरातील सदस्यांना सल्ले देणारा अरबाज निक्कीच्या वेळी कुठे जातो असा प्रश्न चाहत्यांनाही आता पडू लागला आहे. दरम्यान भाऊच्या धक्क्यावर अरबाज मोठा पलटीबाज असल्याचं अभिजीत बोलताना दिसून येणार आहे.
अरबाजच्या पलटी मारण्यावर अभिजीत म्हणाला,”अरबाज पलटी मारणार यावर माझा विश्वास होताच. पण इतकी मोठी पलटी अशा पद्धतीने तो मारेल याबद्दल जरा वाईट वाटलं. घरातील सर्व सदस्यांचा त्याने विश्वासघात केला आहे. जान्हवीने त्याला किती सांभाळलं आहे. त्याच्यासाठी वैभवने निक्कीला सुनावलं होतं की,”काहीही झालं तरी मला बोल पण त्याला काही बोलू नको. त्याच्याजवळ जाऊ नको आणि क्षणातच अशा पद्धतीने फिरणारा माणूस मी आयुष्यात कधीही पाहिला नाही”.
रितेश देशमुख ‘भाऊच्या धक्क्या’वर घरातील सदस्यांना आपला आरसा दाखवणार आहे. यंदाचा भाऊचा धक्का गणपती स्पेशल असल्याने विशेष असणार आहे.
‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BhauchaDhakka
