ढगाला लागली कळं… ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य आज पावसात भिजणार
Bigg Boss Marathi Day 41 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रत्येक सदस्य नेहमीच आपल्या स्टाईलने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. कालच्या भागात गोलीगत सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन झालेला पाहायला मिळालं. सूरजच्या झापुक झुपुक स्टाईलने सर्वांचं काळीज जिंकलंय. आता आजच्या भागात घरातील सदस्य पावसात भिजताना दिसणार आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्य गार्डन एरियामध्ये जमले आहेत. तर बिग बॉस म्हणत आहेत,”आज सर्वांना पावसात भिजता येईल याची व्यवस्था केली आहे”. त्यानंतर घरातील सर्वच सदस्य ‘ढगाला लागली कळं’ या गाण्यावर रेन डान्स करताना दिसत आहेत. सर्वच सदस्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे.
पंढरी शेवटचं पावसात कधी भिजलात? बिग बॉसचा पॅडी दादाला सवाल
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात बिग बॉस पॅडी दादांना विचारत आहेत,”पंढरी शेवटचं पावसात कधी भिजला होतात?”. त्यावर पॅडी म्हणतो,”खूप वर्ष झाली”. बिग बॉस पुढे व. पू, काळेंचं एक वाक्य ऐकवतात,”पाऊस अनेक ठिकाणी एकाचवेळी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं”. तसेच पावसावर चार्ली चॅप्लिन म्हणतात,”मला पावसात भिजायला आवडतं. कारण तेव्हा माझे अश्रू दिसत नाहीत”. त्यानंतर बिग बॉस पुढे पावसात भिजता येण्याची व्यवस्था केली असल्याचं सदस्यांना सांगतात.
‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
