Monday, June 15, 2026
ENTERTAINMENTLatest News

“टिप टिप बरसा पानी”; निक्कीचा रेन डान्स पाहिलात का?

Bigg Boss Marathi Day 41 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य भांडणाने त्रस्त झाले होते. त्यामुळे आज पावसाची सर त्यांना सुखावून जाणार आहे. कोणी ढगाला लागली कळं तर कोणी टिप टिप बरसा पानी या गाण्यावर डान्स करताना दिसून येणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सर्व सदस्यांना नाचवणारी निक्की ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यावर रेन डान्स करताना दिसणार आहे. निक्कीसोबत अरबाजदेखील तिचा डान्स एन्जॉय करताना दिसणार आहे. तर अभिजीत बिग बॉसला पुन्हा एकदा गाणं लावण्याची विनंती करताना दिसणार आहे. एकंदरीतच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज एक वेगळाच माहोल तयार होणार आहे.

‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading