Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

“मला गणपती बाप्पाने कॅप्टन बनवलं”; गोलीगत सूरज चव्हाण स्पष्टच म्हणाला

Bigg Boss Marathi Day 41 : ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा नवा कॅप्टन गोलीगत सूरज चव्हाण झाला आहे. सूरज कॅप्टन झाल्याने घरातील सर्व सदस्य आनंदी आहेत. कॅप्टन सूरज आज कॅप्टनसीबद्दल अंकिता, निक्की, अरबाज, वैभवसोबत चर्चा करताना दिसणार आहे. दरम्यान “मला गणपती बाप्पाने कॅप्टन बनवलं”, असं म्हणताना तो दिसून येईल.

सूरज निक्कीला म्हणतोय,”तू काही चुका करू नकोस”. त्यावर निक्की त्याला नाही करणार असं म्हणते. निक्की म्हणते,”तुझ्या कॅप्टनसीसाठी माझा सगळ्यात मोठा पाठिंबा होता”. तर अंकिता मध्येच म्हणते,”मी मात्र झोपणार”. त्यावर सूरज म्हणतो,”तुला विनंती करतो झोपू नकोस”. अंकिता पुढे म्हणते,”मला बुक्कीत टेंगुळ दिलं आहेस”. सूरज म्हणतो,”मला गणपती बाप्पाने कॅप्टन बनवलं”.

बिग बॉस मराठीच्या घरात सूरज जुळवतोय यमक

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सूरज चव्हाण आज सर्वाधिक चर्चेत आहे. आजच्या भागात सूरज नवे डायलॉग बनवताना दिसणार आहे. या डायलॉगमध्ये त्याला पॅडी दादादेखील मदत करत आहेत. यमक कसं जुळवायचं हे पॅडी दादा सूरजला सांगताना दिसणार आहेत.

‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading