Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेत शिक्षकदिन विविध उपक्रमांनी साजरा


पिंपरी  : जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावली. तसेच शाळेचे नियोजन उत्तमरित्या पार पाडले.
सरस्वती व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय विद्यानिकेतन प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, प्री प्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांनी शिक्षिकांना शुभेच्छा देत त्यांच्या कामाचे कौतुक केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षक बनून प्रत्यक्ष अनुभव घेतला. शिक्षकदिनाचे महत्त्व सांगत शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला. तसेच पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन शिक्षकांचा सत्कार केला. दहावीतील विद्यार्थ्यांनी ‘मुलींची सुरक्षितता’ यावर नाटक सादर केले. सातवीतील विद्यार्थिनींनी ‘स्त्री पुरुष समानता’ हे एकपात्री नाटक सादर केले. दरम्यान, शिक्षकांसाठी विविध खेळांचे आयोजन केले होते, यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत खेळांचा आनंद लुटला.
कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका स्वाती तोडकर व कीर्ती शिंपी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading