Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

कसबा कला करंडक २०२४ च्या माध्यमातून कलाकारांनी केली गणरायाची सेवा

पुणे : पुण्यनगरीचे ग्रामदैवत मानाचा पहिला श्री. कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे, दरवर्षीप्रमाणे कसबा कला करंडक आयोजित करण्यात आला. कसबा कला करंडक म्हणजे होतकरू कलाकारांच्या सुप्त कलागुणांना बहरू देणारे व्यासपीठ. यावर्षीचा कला करंडक रविवारी, ०२ सप्टेंबर, २०२४ रोजी नवीन मराठी शाळा, मुख्य सभागृह येथे पार पडला. त्यावेळी ३० हुन अधिक संख्येने कलाकारांनी भाग घेतला होता. विविध कलागुण सादर करत सर्वांनी गणरायाची सेवा केली. कलागुण सादर करताना सर्व विद्यार्थ्यांचा, सादरकर्त्यांचा आनंद आणि उत्साह गगनात मावेनासा झाला.
मंगलमय अश्या वातावरणात कसबा कला करंडक आनंदात पार पडला. ह्यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत शेटे, विश्वस्त श्री. सौरभ धोकटे, श्री. निलेश वकील, सभासद आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading