Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राजकोट किल्ला प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक

मुंबई  : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा   35 फुटी पुर्णाकृती पुतळा  26 ऑगस्टला कोसळला. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळलाय. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे तर, राज्याचे राजकारण देखील चांगलेच तापले आहे.  शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे.

दोन आठवड्यांपासून जयदीप आपटे फरार होता. अखेर आरोपी जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे.  कल्याणमधल्या घरातून आपटेला अटक करण्यात आली आहे. जयदीप आपटे कुटुंबियांना भेटायला आला असताना त्याला अटक करण्यात आली आहे. कल्याण सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुतळा कोसळल्यानंतर तो फरार झाला होता.

राजकोट पुतळा दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे (Jaideep Apte) विरोधात पोलिसांनी लुक आऊट नोटीस  जारी केली होती. जयदीप आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी सात पथके तयार करण्यात आली होती.  त्यातील दोन पथके तांत्रिक विश्लेषणासाठी आणि पाच पथके मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोवा येथे तपासासाठी रवाना झाली होती.

राजकोटच्या किल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जनतेमध्ये संतापाची लाट आहे. शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला तो जयदीप आपटे या शिल्पकाराने साकारला होता. कोणताही अनुभव नसताना जयदीप आपटेला कंत्राट देण्याचा आरोप विरोधकांनी केलाय.. 26 ऑगस्टला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. यातील एक आरोपी चेतन पाटीलला पोलिसांनी अटक केली. मात्र,जयदीप आपटे फरार होता. अखेर जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागाल आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading