Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

माँट्रा इलेक्ट्रिक, मुरुगप्पा समूहाचा ईव्ही ब्रँड इलेक्ट्रिक स्मॉल कमर्शियल व्हिईकल्स (एससीव्ही) लाँच करण्यासाठी सज्ज

पुणे : माँट्रा इलेक्ट्रिक या १२४ वर्षांचा वारसा लाभलेल्या मुरुगप्पा समूहाच्या ईव्ही ब्रँडतर्फे येत्या काही महिन्यांत ई- एससीव्ही लाँच केली जाणार आहे. या लाँचच्या माध्यमातून समूह इलेक्ट्रिक लघु व्यावसायिक वाहन क्षेत्रात प्रवेश करणार आहे. या लाँचमुळे आणि वाहनाचे आकर्षक डिझाइनदमदार कामगिरी व टिकाऊ बांधणीमुळे भारताच्या मिड- मिल आणि लास्ट माइल मोबिलिटी क्षेत्रात लक्षणीय बदल घडून येणे अपेक्षित आहे. माँट्रा इलेक्ट्रिक एससीव्ही पॉन्नेरी कारखान्यात करण्यात आलेले सखोल संशोधन आणि कठोर चाचण्यांतून विकसित करण्यात आली आहे. बाजारपेठेत असलेली पोकळी आणि ग्राहकांचा अभिप्राय लक्षात घेऊन त्यांची या वाहनाला सर्वाधिक पसंती मिळेल अशी रचना करण्यात आली आहे.

टीव्होल्ट इलेक्ट्रिक व्हिइकल्स ही टीआय क्लीन मोबिलिटीची (टीआयसीएमपीएल) उपकंपनी असून भारतात इलेक्ट्रिक लघु व्यावसायिक वाहने आणि हलक्या वजनाच्या व्यावसायिक वाहन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून शहरी वाहतुकीचे चित्र बदलण्यासाठी सज्ज आहे. टीव्होल्टने ग्राहकांच्या नफ्याला प्राधान्य देणाऱ्या नाविन्यपूर्ण आणि शाश्वत वाहन सुविधा उपलब्ध करण्याचे व त्याचबरोबर हरित, कार्यक्षम वाहनांची वाढती मागणी पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे. वाहन क्षेत्राचे स्वरूप बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी, पर्यावरणावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी आणि पर्यायाने आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कंपनी बांधील आहे. कंपनीने इलेक्ट्रिक लघु व्यावसायिक वाहनांवर लक्ष केंद्रित केले असून टिव्हॉल्टचे धोरण केवळ व्यावसायिक यश मिळवण्यावरच नव्हे, तर समाज व पर्यावरणाचे हित साधण्यावर भर देणारे आहे.

टिव्हॉल्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी  संजू नायर म्हणाले, ‘टिव्हॉल्ट हे आमच्या पर्यावरपूर वाहतूक सुविधा देण्याच्या बांधिलकीचे प्रतिनिधीत्व करत असून त्याद्वारे विकास आणि नाविन्याचे नवे पर्व सुरू करण्याचे ध्येय आहे. जगभरात आणि भारतातही इलेक्ट्रिक वाहन उद्योग आकर्षक टप्प्यातून जात असून आम्ही हे उत्पादन विकसित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत व या लाँचची उत्सुकतेनं वाट पाहात आहोत. माँट्रा इलेक्ट्रिकमध्ये आम्ही ग्राहक तसेच व्यवसायासाठी हितकारक व्यवहार्य आणि शाश्वत सुविधा     उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. टिव्होल्ट ई- एससीव्हीच्या सहकार्याने आम्ही पर्यावरणावर लक्षणीय सकारात्मक परिणाम घडवून आणण्याचे आणि कार्बन न्युट्रिलिटीच्या दिशेने जगाच्या प्रवासासाठी हातभार लावण्याचे ध्येय ठेवले आहे. इलेक्ट्रिक एससीव्ही क्षेत्र लक्षणीय विकास घडवून आणण्यासाठी सज्ज असून २०७० पर्यंत उत्सर्जन शून्यावर आणण्याच्या भारताच्या प्रवासात हे क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल. या क्षेत्रातील अग्रेसर आणि भारतीय कंपनी या नात्याने सरकारच्या शाश्वत भविष्याच्या उद्दिष्टासाठी योगदान देणं आमच्यासाठी सन्माननीय आहे.’

लघु व्यावसायिक वाहन क्षेत्रात स्थित्यंतर घडवून आणण्याची टिव्हॉल्टची बांधिलकी उत्पादन विकासाच्या पलीकडे जाणआरी आहे. ती शाश्वत आणि ग्राहकाभिमुख वाहतूक सुविधा तयार करत या क्षेत्रात मोठा बदल घडवून आणण्याचे प्रतीक आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेविषयी ज्ञान यांच्या सहकार्याने टिव्हॉल्टने या उद्योगात गुणवत्तेचे नवे मापदंड प्रस्थापित करत भारतात लघु व्यावसायिक वाहनांच्या विकासाला मोठी चालना देण्याचे ठरवले आहे. सातत्यपूर्ण नाविन्य आणि ग्राहक समाधानाप्रती बांधिलकीच्या मदतीने टिव्हॉल्ट भारतीय बाजारपेठेतील लघु व्यावसायिक वाहनांविषयी दृष्टीकोन, त्यांचा केला जाणारा वापर यात क्रांती आणण्यासाठी सज्ज आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading