Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

बहुभाषिक सेवेसह एअर इंडिया ग्राहकांना देते अधिक सुविधा

सात भारतीय भाषांमध्ये अतिरिक्त ग्राहक समर्थन देणारी पहिली भारतीय विमान कंपनी

गुरुग्राम : भारतातील अग्रगण्य जागतिक विमान कंपनी एअर इंडियाने चोवीस तास देण्यात येणाऱ्या ग्राहक समर्थन सेवांमध्ये सात नवीन भाषांचा अंतर्भाव केला आहे. ग्राहक आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, पंजाबी, तामिळ आणि तेलगू या भाषांमधील सेवा निवडू शकतात.

एक देश म्हणून, भारतामध्ये भाषिक विविधता, बाज आणि देशभर बोलल्या जाणाऱ्या अनेक बोलीभाषा आहेत. या सात भारतीय भाषांची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देत एअर इंडियाचे उद्दिष्ट ग्राहकांना चांगला अनुभव देणे हे आहे. तसेच आपल्या मूळ भाषांमध्ये संवाद साधण्यास प्राधान्य देणाऱ्या प्रवाशांना अधिक सुलभ अनुभव देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. कंपनी भारतीय भाषांना देत असलेले हे समर्थन पाहता ‘भारतीय हृदयासह जागतिक एअरलाइन’ बनण्याची एअरलाइनची दृष्टी प्रतिबिंबित करते.

एअर इंडियाची IVR प्रणाली आता ग्राहकांच्या मोबाइल नेटवर्कवर आधारित ग्राहकाची प्राधान्य भाषा आपोआप ओळखेल, यामुळे मॅन्युअली भाषा निवडण्याची गरज दूर करेल आणि त्यामुळे प्रतिसादाचा वेळ कमी करेल.

“भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक समर्थनाची सोय ही आमच्या परिवर्तनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या भारतीय भाषांचा समावेश आमच्या ग्राहक सहाय्य सेवांमध्ये करून, आम्ही केवळ आमचा विस्तारच करत नाही तर एअर इंडियासोबतचा प्रत्येक संवाद परिचित आणि सर्वसमावेशक वाटेल याची खात्री ग्राहकांना देतो. आणि ग्राहकांसोबतचे आमचे नाते मजबूत करत आहोत,” असे एअर इंडियाचे मुख्य ग्राहक अनुभव अधिकारी राजेश डोग्रा यांनी सांगितले.

अलीकडेच एअर इंडियाने पाच नवीन संपर्क केंद्रे सुरू केली आहेत, जी जगभरातील प्रीमियम आणि फ्रिक्वेंट फ्लायर्सना चोवीस तास सहकार्य करतात. एअर इंडियाच्या ग्राहकांना भारतीय भाषांमधील विशेष सहाय्य भारतीय वेळेनुसार दररोज 0800 ते 2300 पर्यंत उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त, एअरलाइनने ईमेल, सोशल मीडिया आणि इन-हाउस चॅट सपोर्ट व्यवस्थापित करण्यासाठी बॅक-ऑफिस इन्सोर्सिंग धोरण लागू केले आहे. यामुळे ग्राहक समर्थन सेवांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता लक्षणीयरीत्या सुधारली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading