Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील खट्याळ सासू अन् नाठाळ सून पाहिलीत का? गोलीगत सूरज बनलाय भावजी

Bigg Boss Marathi New Season Day 32 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील काही सदस्यांमध्ये वाद होत आहेत. तर काही सदस्यांमध्ये मात्र चांगलीच मैत्री पाहायला मिळत आहे. सदस्य आता जोडीत अडकले गेले आहेत. जोड्यांच्या बेड्यांनी काहींच्या मैत्रीत मेळ जमवला आहे. या जोड्यांच्या बेडीत आज एक जोडी मात्र चांगलीच गाजणार आहे. तर दुसरीकडे ही बेडी कोणाचा गेम करणार याकडेही सर्वांचच लक्ष लागलं आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात कालच्या भागात खट्याळ सासू आणि नाठाळ सुनेचा धमाल किचन ड्रामा पाहायला मिळाला. तर गोलीगत सूरज भावजी मात्र दुरून मजा घेताना दिसून आले. समोर आलेल्या प्रोमोमध्ये,सूरज वर्षाताईंना म्हणतोय,”आई या वहिनींना सांग जरा”. त्यावर अंकिता म्हणते,”भावजी लावलं की नाही सासूबाईंना कामाला”. त्यावर वर्षा ताई म्हणतात,”आता मी सूनबाईंना कामाला लावणार आहे”. अंकिता म्हणते,”मी कामं करणारच नाही..माझी मर्जी”. पॅडी म्हणतो,”भावजी भावजी मिठाचा खोका… भावजींच्या मिशीवर बसला बोका”.

किचनमधल्या कामावरून खट्याळ सासू आणि नाठाळ सुनेची चांगलीच धमाल सुरू आहे. अंकिता आणि वर्षा ताईंचे ‘तू तू मैं मैं’ पाहणं प्रेक्षकांसाठी मात्र मनोरंजक ठरत आहे.

‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading