Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

“बिग बॉस मराठी’च्या घराची मी महाराणी”; निक्कीच्या वक्तव्यावर जान्हवी अन् अरबाज म्हणाले…

Bigg Boss Marathi New Season Day 31 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दररोज नवा ड्रामा सुरू असतो. महिन्याभरातच निक्कीने A टीमला रामराम केला आहे. भाऊच्या धक्क्यावर A टीमला ट्रॉफी उचलू न देण्याचं ओपन चॅलेंज निक्कीने दिलं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात चक्रव्युहात अडकल्यानंतर निक्कीची खेळ खेळण्याची चक्र बदलली आहेत. टीम A मधल्या सदस्यांसोबत निक्की आज वाद घालताना दिसून येणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये निक्की, वैभव आणि जान्हवीमध्ये झालेला राडा पाहायला मिळतोय. निक्की म्हणतेय,”बिग बॉस मराठीच्या घराची मी महाराणी आहे”. त्यावर जान्हवी म्हणते,”तू नोकराणी पण होऊ शकत नाहीस”. त्यावर निक्की वैभवला म्हणते,”कॅप्टन तरी तुम्ही होऊ शकता का?”. निक्कीला उत्तर देत वैभव म्हणतो,”न्हासके… बास कर”. त्यावर निक्की त्याला बच्चू म्हणते. पुढे वैभव निक्कीला म्हणतो,”तोंड दिलंय म्हणून काहीही बोलू नको. तुझी मस्ती जिरवली नाही ना तर बघ”.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची बदललेली रूप पाहताना प्रेक्षकांना खूप मजा येत आहे. तर दुसरीकडे सदस्यांना बंधनात अडकलेलं पाहणंदेखील मनोरंजक ठरत आहे. आता आजच्या भागात नक्की काय होणार हे जाणून घेण्यासाठी आजचा भागच पाहावा लागेल.

‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading