Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

आपण जे करतो तेच आपल्याला मिळते..”पॅडी दादांचा अभिजितला टोला

Bigg Boss Marathi New Season Day: बिग बॉसच्या घरातमध्ये सदस्यांमधील प्रत्यके आठवड्याला काय प्रत्येक दिवशी बदलताना दिसत आहेत. निक्की आणि जान्हवीची ३० दिवसांची मैत्री एका दिवसात संपली. तर, दुसरीकडे अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीमध्ये देखील अभिजीतमुळे दुरावा आला आहे. निक्की आणि अभिजीतची जोडी आता घरात कोणता नवीन कल्ला करणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. प्रत्येक सदस्याच्या डोक्यात वेगळीच प्लनिंग सुरु असल्याचे दिसत आहे. निक्की टीम ‘बी’ मधल्या पॅडी दादा, अभिजित आणि सुरज यांच्या सोबत बोलताना दिसत आहे.

आज घरामध्ये पॅडी दादा अभिजीतला म्हणत आहेत की ,” तुझ्यावर जर अरबाजसारखी वेळ आली तर कॅप्टनसी दुसऱ्याला द्याची तर ती तू मला दे.. “त्यावर निक्की हसून म्हणते की ,” आता तर मी हक्काने म्हणू शकते की, तू माझा विचार कर.यासगळ्या वर अभिजित पॅडी दादांना म्हणतो की ,” मला तुमच्या सगळ्यांबद्दल मनात खूप प्रेम आहे. पण तुम्ही आता तसे नाही राहिलात. एखाद्या माणसाला जर तुम्हाला त्रास द्याचा असेल तर तुम्ही तो दिला आहे. तुम्ही निक्कीला देखील त्रास देत आहेत. आमच्या दोघानांपण टार्गेट केले जात आहे. त्यावर पॅडी दादा म्हणत आहे ,”आपण जे वागलो आहे तेच आपल्याला परत मिळत असते आणि आम्ही त्रास नाही देत गमंतीच करत आहोत जसे तू करायचास.”

BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading