Friday, October 23, 2026
Latest NewsMAHARASHTRASports

ऑलिंपिकवीर कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्या जन्म गावी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्रीडा संकुल होणार

सातारा: ऑलिंपिकमध्ये कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारातील पहिले पदक भारताला मिळवून देणारे ऑलिंपिकवीर कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्या जन्म गावी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती क्रीडा संकुल उभारण्याचे क्रीडाप्रेमीचे स्वप्न अखेर साकारले जाणार आहे. 

या क्रीडा संकुलासाठी राज्य सरकारने 25 कोटी 75 लाखांचा निधी जाहीर केला आहे. आतापर्यंत तुटपून जा निधी आणि स्मारकासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेबाबत न्यायालयात सुरू असलेले तीन दावे यामुळे क्रीडा संकुलाच्या कामाचे घोंगडे भिजत पडले होते. 

या पूर्वी खाशाबा जाधव यांचे जन्मगाव असलेल्या कराड तालुक्यातील गोळेश्वर ग्रामपंचायतीने क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र या जागेबाबतचे तीन दावे न्यायालयात प्रलंबित होते. जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर त्यापैकी दोन दावे मागे घेण्यात आले आहेत. या क्रीडा संकुलासाठी यापूर्वी राज्य सरकारने केवळ एक कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन सरकारने या कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. 

काही काळापूर्वी क्रीडा प्रेमींनी खाशाबा जाधव यांचे स्मारक म्हणून क्रीडा संकुलाची उभारणी मार्गी लागावी यासाठी कुस्तीगीर व क्रीडाप्रेमी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली होती. या स्मारकासाठी सकारात्मक प्रतिसाद देत पाठपुरावा करण्याची ग्वाही मोहोळ यांनी क्रीडा प्रेमींच्या शिष्टमंडळाला दिली होती. त्यानंतर स्मारकाच्या कामाला वेग आला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading