Sunday, June 7, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

लडाख क्षेत्रात पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती

नवी दिल्ली:  केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रशासित लद्दाख क्षेत्रात पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रशासनाला अधिक बळकटी आणि गतिमानता मिळून सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल, असा केंद्रीय गृहमंत्रालयाचा दावा आहे. 

जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरला स्वतंत्र राज्य  घोषित केले तर लद्दाख हा केंद्रशासित प्रदेश करण्यात आला. सध्या लद्दाखमध्ये लेह आणि कारगिल हे दोन जिल्हे असलेल्या लद्दाखमध्ये झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे पाच नवे जिल्हे निर्माण केले जाणार आहेत. 

देशाच्या कानाकोपऱ्यात प्रशासन अधिक बळकट आणि गतिमान केल्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा मिळेल. त्यासाठीच लद्दाखमध्ये पाच नवे जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. लद्दाखच्या जनतेला प्रगतीच्या अधिकारीक संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा दावाही त्यांनी केला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading