भाऊच्या धक्क्यावर सदस्य फेस करणार, निर्भीड दुर्गाचे निडर प्रश्न!
‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने जान्हवीची चांगलीच हजेरी घेतली. तसेच भाऊच्या धक्क्यावर स्थान न देता तिला जेलची शिक्षादेखील सुनावली. आता आजचा भाऊच्या धक्क्यावर काय होणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. आज भाऊच्या धक्क्यावर सदस्य निर्भीड दुर्गाच्या निडर प्रश्नांना सामोरे जाताना दिसून येतील.
कलर्स मराठी वाहिनीवर ‘दुर्गा’ ही नवी मालिका 26 जुलैपासून दररोज संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजच्या भाऊच्या धक्क्यावर दुर्गा मालिकेच्या कलाकारांनी अर्थात रूमानी खरे, अंबर गणपुले आणि शिल्पा नवलकर यांनी हजेरी लावली आहे. दुर्गाने घेतलेल्या रॅपिड फायरमध्ये कोण जिंकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
भाऊच्या धक्क्याच्या आजच्या प्रोमोमध्ये दुर्गा डीपीदादाला विचारतेय,”आई आणि बायकोला फोन कॉल की एक किलो मटन”. वैभवला विचारतेय,”कोणाची मैत्री जास्त महत्त्वाची आहे इरिना की अरबाज”, अरबाजला विचारतेय,”या घरात तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं प्रेम की गेम”. आता रॅपिड फायरमध्ये सदस्य काय उत्तर देणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BhauchaDhakka
