Thursday, September 24, 2026
BusinessLatest News

लॉरियल इंडियाने १०० टक्के अक्षय ऊर्जेचा टप्पा गाठला

 

पुणे : लॉरियल इंडियाने जाहीर केले आहे की, त्यांचे बद्दी- हिमाचल प्रदेश, चाकण- महाराष्ट्र येथील उत्पादन प्लांट, मुंबई आणि बंगळूर येथील संशोधन आणि इनोव्हेशन सेंटर्स तसेच महत्त्वाच्या मेट्रो शहरातील कार्यालये आता १०० टक्के अक्षय उर्जेवर चालत आहेत. हवामान बदलाशी झगडताना अधिक शाश्वत संचालन मॉडेल उभे करण्याच्या लॉरियलच्या भावी लक्ष्यास तसेच ग्लास्गो सीओपी २६ येथे भारताने व्यक्त केलेल्या आपल्या महत्त्वाकांक्षी नेट झीरो उत्सर्जनाच्या लक्ष्यास अनुसरून हा महत्त्वाचा टप्पा लॉरियलने गाठला आहे.

एक दशकापेक्षा जास्त काळापासून लॉरियल इंडिया आपल्या भारतातील संचालनाचा पर्यावरणावर कमीत कमी प्रभाव पडावा यासाठी ऊर्जा-सजग निर्णयांच्या माध्यमातून शाश्वत वृद्धीसाठी प्रयत्नरत आहे.लॉरियल अक्षय ऊर्जा प्राप्त करण्यात पारदर्शकता आणि माग काढण्याच्या क्षमतेला प्राधान्य देते. त्यासाठी, त्यांनी अशा प्रणाली लागू केल्या आहेत,आपल्या ऊर्जा आवश्यकता पूर्ण करण्यासाठी लॉरियलने हिमाचल प्रदेशात नदीच्या जवळ आपली सुविधा असल्याचा लाभ घेऊन जल विद्युतचा वापर केला आहे, तर महाराष्ट्रात राज्य-समर्थित पवन आणि सौर ऊर्जेचा उपयोग केला आहे.

ऑक्टोबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रातील लॉरियलच्या चाकण प्लांटने दीर्घकालीन वीज खरेदी कारारासह पवन आणि सौर ऊर्जेचा अंगिकार केला आणि नैसर्गिक वायूची जागा बायोमास बॉयलरने घेतली. हवामानावर आधारित स्रोत अनुपलब्ध असताना देखील विश्वसनीय ऊर्जा पुरवठा निरंतर मिळावा याची खातरजमा करण्यासाठी हा प्लांट सोलर पॅनल्सचा उपयोग करतो.

हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याचा आनंद साजरा करताना लॉरियल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक असीम कौशिक म्हणाले, “भारतातील आमच्या ३० व्या वर्षात या लक्षणीय सिद्धीमधून स्वतःचा कायापालट करण्याची आमची वचनबद्धता दिसते. यामधून आपला व्यवसाय जबाबादरीने वाढवताना लॉरियल इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या शाश्वततेची मानसिकता आणि लवचिकता देखील दिसून येते. शाश्वतता हा मूल्य शृंखलेच्या प्रत्येक टप्प्याला सामावून घेणारा एक निरंतर प्रवास आहे. भारतात १०० टक्के अक्षय ऊर्जेचा टप्पा गाठणे हा आमच्या शाश्वततेच्या प्रवासातील अनेक टप्प्यांपैकी एक टप्पा आहे. लॉरियल इंडिया विज्ञानाधिष्ठित लक्ष्यांना अनुसरून व्यवसाय कार्यांत बदल करण्याचे चालू ठेवेल आणि आमच्या बिझनेस इकोसिस्टमला अधिक शाश्वत जगाकडे घेऊन जाण्यासाठी सक्षम बनवेल.”

जबाबदार विकासाच्या संस्कृतीला प्रोत्साहन देत, एका बहुआयामी धोरणाचा अंगिकार करून लॉरियल इंडिया १०० टक्के अक्षय ऊर्जा महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी कार्यरत आहे. ऊर्जेचा वापर कमी करणे / ऊर्जेचा अपव्यय टाळणे: ऊर्जा-सक्षम उपकरणांचा वापर सुरू करून, सोलर वॉटर हीटिंग सारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर करून आणि स्टीम कंडेन्सेशनमधून टाकाऊ ऊर्जेचा पुनर्वापर करण्यासारख्या ऊर्जेची बचत करणाऱ्या पद्धती लागू करून लॉरियलने उत्पादन प्लांट्समध्ये आणि संचालन साइट्सवर ऊर्जा वापरात कपात केली आहे.

पर्यावरण आणि कार्यक्षमता यांच्यात संतुलन साधणे: चाकण आणि बद्दी प्लांटमध्ये लॉरियलने पवन, जल आणि सौर ऊर्जेतून मिळणाऱ्या अक्षय ऊर्जेचा उपयोग सुरू केला आहे, ज्यामुळे संचालनादरम्यान नगण्य ग्रीनहाऊस गॅसेसचे उत्पादन होते, जे हवामान बदलाशी लढा देताना महत्त्वपूर्ण आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading