सिप्लाच्या ब्रीदफ्री उपक्रमाअंतर्गत मॉन्सून यात्रेस सुरुवात
पुणे : मान्सून ऋतू उष्णतेपासून दिलासा देतो, परंतु तो श्वसन आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आव्हानेही आणतो. वाढलेली आर्द्रता आणि ओलसरपणा फुफ्फुसांच्या आजारांना वाढवू शकतात, त्यामुळे या काळात काळजी घेणे अत्यावश्यक आहे. हे लक्षात घेऊन आणि रुग्णांची सक्रिय काळजी घेण्याच्या वचनबद्धतेनुसार, सिप्लाच्या सर्वसमावेशक रुग्ण समर्थन उपक्रम – ब्रीदफ्री ने आपली मॉन्सून यात्रा सुरू केली आहे. व्यक्तींना त्यांच्या श्वसन आरोग्याची स्थिती समजून घेण्यास मदत करण्याच्या उद्देशाने, यात्रा अस्थमा आणि सीओपीडी (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीज) सारख्या दीर्घकालीन फुफ्फुसांच्या आजारांसाठी स्क्रीनिंगची सुविधा उपलब्ध करून देते. तीन महिन्यांच्या कालावधीत, देशभरात ४, ००० हून अधिक शिबिरे आयोजित केली जातील, ज्यामध्ये ३५०,००० हून अधिक लोकांची तपासणी केली जाईल.
डॉ.विशाल रमेश मोरे, चेस्ट फिजिशियन, म्हणाले , “मान्सूनमध्ये अनेक ट्रिगर्स येतात, ज्यात वाढलेली आर्द्रता, बुरशी, थंड हवा आणि विषाणू संसर्गाचा अधिक धोका यांचा समावेश आहे. हे घटक कोणत्याही व्यक्तीच्या श्वसन आरोग्यावर परिणाम करू शकतात, परंतु पूर्वीपासून श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी ते महत्त्वपूर्ण आव्हाने आणतात. आर्द्र वातावरणात वाढणारे ऍलर्जन्स, जसे की बुरशी आणि धूळ कण, ऍलर्जिक प्रतिक्रिया निर्माण करू शकतात आणि अस्थमा तसेच सीओपीडी ची लक्षणे वाढवू शकतात, ज्यामुळे हल्ला होऊ शकतो. खरं तर, संशोधनात आढळले आहे की वादळानंतर अस्थमाच्या केसेस, ज्यात तीव्र ब्राँकोस्पॅझमचा समावेश आहे, लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत, ज्याला “थंडरस्टॉर्म अस्थमा” म्हणून ओळखले जाते ब्रीदफ्री मॉन्सून यात्रेसारख्या उपक्रमांनी वेळीच स्क्रीनिंग तसेच रोग व्यवस्थापन, योग्य उपकरण तंत्र, आणि उपचारांचे पालन यावर सल्ला देणे अत्यंत आवश्यक आहे, विशेषतः अशा ऋतूंमध्ये ज्यामुळे या स्थिती तीव्र होतात.”
सिप्लाच्या ब्रीदफ्री उपक्रमाने अस्थमा आणि सीओपीडी रुग्णांना स्क्रीनिंग, सल्लामसलत आणि उपचारांचे पालन या क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक समर्थन साधने पुरवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. ऑन-ग्राऊंड स्क्रीनिंग कॅम्पपासून ते आता एआई -सक्षम ब्रीदफ्री डिजिटल एज्युकेटर प्लॅटफॉर्म आणि उपकरण प्रशिक्षणाच्या ‘कसे करावे’ व्हिडिओपर्यंत; ब्रीदफ्रीने श्वसन समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी एक-स्टॉप समर्थन समाधानात विकसित केले आहे. ब्रीदफ्री मॉन्सून यात्रा हे या प्रयत्नांचेच एक विस्तारित रूप आहे, जे देशभरातील व्यक्तींना हवेच्या गुणवत्तेची माहिती आणि संसाधने उपलब्ध करून देणे सुनिश्चित करते, ऋतू कोणताही असो.
भारत एक वाढता आरोग्य संकटाचा सामना करत आहे, ज्यामध्ये नॉन-कम्युनिकेबल डिजीजेस (अनसीडीस) मध्ये लक्षणीय वाढ होत आहे. यात क्रॉनिक श्वसन आजार हे देशातील सर्व मृत्युंपैकी सुमारे ६० टक्क्यांसाठी जबाबदार असलेल्या तीन प्रमुख अनसीडीस मध्ये आहेत. प्रारंभिक शोध आणि हस्तक्षेपामुळे लक्षणे आणि जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते, परंतु अस्थमा आणि सीओपीडी च्या बहुतेक केसेसचे निदान होत नाही. गंभीर अस्थमाच्या लक्षणांसह सुमारे ७० टक्के व्यक्तींचे क्लिनिकल निदान होत नाही, तर अंदाजे९५- ९८% सीओपीडी केसेसचे निदान होत नाही.यामुळे रोगाबद्दल जागरूकता, शोध आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी देशव्यापी प्रयत्नांची तातडीची गरज अधोरेखित होते, जे वाढलेल्या स्क्रीनिंग तसेच सल्लामसलत संधी आणि सततच्या समर्थनाद्वारे साध्य केले जाऊ शकते. विशेषतः मान्सूनसारख्या उच्च-जोखीम ऋतूंमध्ये हे खूपच खरे आहे.
जागरूकता आणि कृतीच्या एकत्रित दृष्टिकोनामुळे ब्रीदफ्री सारखे उपक्रम पुढे जातात. अस्थमाला कलंकित न करण्याचे आणि प्रभावी उपचारांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट असलेल्या बिनधास्त जिंदगी आणि टफीज सारख्या जागरूकता मोहिमांसह हे प्रयत्न रुग्णांसाठी मजबूत समर्थन नेटवर्क निर्माण करतात.
