“मी रितेश देशमुख आहे मला हलक्यात घेऊ नका”; भाऊच्या धक्क्यावर रितेशने सुनावलं
BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
‘बिग बॉस मराठी’च्या घराची चौथ्या आठवड्याची निक्की कॅप्टन झाली आहे. खरंतर हे कॅप्टनसीपद निक्कीकडे अरबाजमुळे आलं. पण कॅप्टन पद मिळाल्यानंतर निक्कीचं एक वेगळचं रूप पाहायला मिळालं. निक्कीने कॅप्टनसीचा चुकीचा वापर केला. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेशने कॅप्टन निक्कीची चांगलीच शाळा घेतली आहे.
भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख निक्कीला चांगलच सुनावताना दिसणार आहे. रितेश भाऊ म्हणतोय,”निक्की तुम्ही हलक्या कानाचे आहात आणि तुमची बुद्धीदेखील हलकीच आहे. तुम्हालाना या घरातले चावी मारतात…मी रितेश देशमुख आहे मला हलक्यात घेऊ नका”.
‘बिग बॉस मराठी’चा हा गेम डोक्याने खेळण्याचा आहे. रितेश भाऊ दर आठवड्याला सदस्यांची हजेरी घेताना दिसून येतो. या आठवड्यातही तो सदस्यांची चांगलीच शाळा घेताना दिसून येणार आहे.
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
