Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

रक्षाबंधन: राख्यांच्या मार्केट मध्ये दादाचीच हवा !

तो आला आणि त्याने जिंकलं ! आईची माया लावणारा, करारी मर्द, करड्या शिस्तीचा मात्र बहिणींच्या सुखासाठी, त्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांची लग्न उत्तमोत्तम घरात लागावीत यासाठी दिवस रात्र जीवाचे रान करणारा ‘लाखात एक आमचा दादा’. मोठ्या दिलाचा राजामाणुस ‘सूर्यादादा’ तो आला आणि पाहता पाहता त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळाच स्थान  केलं. महिन्याभरापूर्वी सुरु झालेल्या लाखात एक आमचा दादा या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केली. ही  मालिका  प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरताना दिसत आहे, इतकी की रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर राख्यांच्या मार्केट मध्ये फक्त दादाच्याच राख्यांची हवा आहे.

सूर्यादादाला चार बहिणी. तेजू, धनु, राजू, भाग्या.  तेजश्री एका शाळेत शिक्षिका आहे, तिला लहान मुलांचे प्रचंड वेड आहे आणि आयुष्याबद्दल ती प्रचंड आशावादी आहे. दुसरी बहिण धनश्री हिला सतत काहीतरी खायला लागतं. अंगाने जाड असल्याने सूर्याला तिच्या लग्नाची काळजी आहे. धनुला इंग्रजी विषयाशी वाकडे आहे. ती इंग्रजी पास होण्याची वाट सूर्याच नाही तर सगळं गाव पाहतंय, सूर्याची तिसरी बहिण राजश्री घरात लहान असूनही घरची काळजी घेणे रखरखाव करणे हिशेब करणे ती एकप्रकारे घरची फायनान्स मिनिस्टर आर्ह. राजश्री शिकलेली नाही पण व्ययहारात चोख आहे. चौथी बहिण भाग्यश्री ही अजूनही शाळेत शिकते. तिला गाणे शिकायचे आहे. अशा या अतरंगी बहिणींचा सूर्या दादा आहे. लहानपणीच आई घर सोडुन पळून गेली. म्हणून सूर्या चारही बहिणींची आई झाला. प्रचंड शिस्तीने त्याने बहिणीना वाढवलं. जेणेकरून उद्या कुणी तोंड वर करून असं बोलायला नको की आईविना वाढलेल्या मुली वाया गेल्या. असं असलं तरी बहिणींचं सूर्यावर प्रचंड प्रेम आहे. सूर्याची स्वतःसाठी काहीच स्वप्न नाहीत. त्याने त्याचं बालपणीचं प्रेम ही त्याच्या मनातच ठेवलं आहे. तुळजा जिच्यावर सुर्याचं प्रेम आहे. तुळजा मात्र या सगळ्यापासून अजाण आहे. पुढे तुळजा शिकायला म्हणून शहरात गेली आणि घरच्या परिस्थितीमुळे सूर्याने त्याचे स्वप्न उरात कुठेतरी दाबून टाकलाय.

अश्या या सूर्यादादा आणि त्याच्या बहिणींची गोष्ट पाहायला विसरू नका दररोज रात्री ८.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading