Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

एमक्युअर फार्मास्युटिकल्सतर्फे आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीत 17% महसूल वाढ आणि 16% EBITDA वाढीसह मजबूत निकाल जाहीर

पुणे : एमक्युअर फार्मास्युटिकल्स (BSE:544210, NSE: EMCURE) ने ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे बिगर लेखापरीक्षण असे एकत्रित आर्थिक निकाल आज जाहीर केले. कंपनीने EBITDA आणि महसूल दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ मिळवत सर्व भौगोलिक क्षेत्रांमध्ये मजबूत कामगिरीचे प्रदर्शन केले.

स्थिर आधारभूत व्यवसाय कामगिरी आणि Sanofi च्या कार्डिओव्हस्कुलर ब्रँड्ससाठी वितरण भागीदारीमुळे मदत मिळून एकूण महसुलात 50% प्रमाण असलेला कंपनीचा देशांतर्गत व्यवसाय 14% ने वाढून 909 कोटी रु. झाला आहे. Sanofi ब्रँड पोर्टफोलिओ आणि टीम आता एमक्युअरच्या क्रॉनिक टीममध्ये पूर्णपणे सामावल्या आहेत आणि कामगिरी कंपनीच्या अपेक्षांनुसार आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर युरोपने 8.6% ची स्थिर वाढ पाहिली आहे. त्यामुळे कंपनीच्या मूलभूत व्यवसायाच्या बाजारपेठीय हिस्स्यामध्ये वाढ झाली. कॅनडामध्ये, एमक्युअरच्या उपकंपन्या मार्कन आणि मंत्रा मजबूत कामगिरी आणि वाढ दाखवत आहेत. एमक्युअर कॅनेडियन बाजारपेठेतील आघाडीच्या १० जेनेरिक कंपन्यांपैकी एक आहे. उर्वरित जागतिक (ROW) बाजारपेठेमध्ये, कंपनीने तिच्या प्रमुख बाजारपेठेमध्ये चांगली कामगिरी सुरू ठेवली आहे.

निकालांवर भाष्य करताना एमक्युअर फार्मास्युटिकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश मेहता म्हणाले, “एमक्युअर ने पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी पाहिली. आम्ही आमच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीचे फायदे अनुभवत आहोत. आमच्या अलीकडील दोन्ही इनऑर्गनिक भर भारतातील Sanofi आणि कॅनडातील Mantra आता पूर्णपणे सामावून गेल्या आहेत. पुढे जाऊन आमचे लक्ष आमच्या भारतातील व्यवसाय वाढवण्यावर आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आमच्या उत्पादनांच्या सादरीकरणाला गती देण्यावर असेल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading