जेवणावरून आर्याचा डीपीसोबत झालाय कल्ला
Bigg Boss Marathi New Season Day 19 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्या दिवसापासून अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरातल्या अनेक सदस्यांमध्ये वाद सुरू झाले आहेत. तसेच बिग बॉस काही मजेदार टास्कदेखील घरातल्या सदस्यांना देत आहेत. घरात सध्या दोन गट पडले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जेवणावरुन आर्या आणि डिपीमध्ये कल्ला झालेला पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये डीपी आर्याला म्हणतोय,”मला असं वाटतं की तु कमी खावं”. त्यावर आर्या म्हणते,”माझ्या जेवणावर कमेंट करायची नाही… मी एकदा जेवण करेल..दोनदा जेवण करेल..तुम्ही मला सांगू नका””. त्यावर धनंजय आर्याला म्हणतो,”तू तोंड बंद कर मग”. तर आर्या तोंड बंद करण्यास नका देते. यावर धनंजय तिला म्हणतो,”मग मी तुला खाताना बोलणार”.
तिसऱ्या आठवड्यात बिग बॉस सदस्यांना आणखी कोणते नवे टास्क देणार, याविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता आहे. प्रेक्षकांना दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी हा शो पाहता येईल. तसेच Jio Cinema वरदेखील या कार्यक्रमाचे अपडेट्स पाहता येतील.
‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
