सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ NIRF (State University Category )रँकिंगमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क २०२४ (National Institutional Ranking Framework 2024)जाहीर झाले असून त्यात देशातील स्टेट यूनिवर्सिटी कॅटेगिरीत शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनात केलेल्या कामगिरीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास तिसरे क्रमांक प्राप्त झाले आहे. यात पहिल्या क्रमांकवर चेन्नई येथील अण्णा युनिव्हर्सिटी व दुसऱ्या क्रमांकावर कलकत्ता येथील जादवपूर युनिव्हर्सिटी आहे.
याव्यतिरिक्त, एकूण (overall Category)श्रेणीमध्ये, SPPU ने देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रशंसनीय ३७ वे स्थान प्राप्त केले आहे. विद्यापीठ (University Category) श्रेणीमध्ये, SPPU ने भारतातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी एक म्हणून त्याची प्रतिष्ठा अधोरेखित करून २३ वा क्रमांक मिळवला आहे. NIRF रँकिंग हे SPPU च्या दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे आणि भावी आकार देण्याच्या त्याच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. विद्यापीठ ज्ञानाची प्रगती करण्यासाठी, नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी आणि राष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी समर्पित आहे.
केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय राज्य शिक्षण मंत्री सुकांता मुजुमदार, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव के.संजय मूर्ती, यूजीसीचे अध्यक्ष एम.जगदीश कुमार, एआयसीटीचे अध्यक्ष टी.जी. सितारामन, एनबीए अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे, अनिल नासा, शिक्षण विभागाचे अधिकारी सुनील कुमार बनवाल, गोविंद जयस्वाल यांच्या उपस्थितीत नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क २०२४ ची घोषणा करण्यात आली. तसेच विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी यावेळी विद्यापीठाचे रँकिंग स्वीकारले.
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क २०२४ मध्ये देश पातळीवरील स्टेट युनिव्हर्सिटी कॅटेगिरीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनात केलेल्या कामगिरीमुळे देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य व विविध अधिकार मंडळाचे सदस्य यांचे विद्यापीठाच्या विकासात्मक वाटचालीत महत्त्वाचे योगदान आहे. तसेच विद्यापीठातील व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी दिलेल्या योगदानामुळे विद्यापीठाने देश पातळीवरील हे रँकिंगमध्ये चांगले स्थान मिळवले आहे.
- प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
