Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

मनसे तर्फे दहावी, बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान


पुणे:महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या प्रभाग 17 चिंचवडेनगर वाल्हेकरवाडी विभागाच्या वतीने
मनविसे सचिव अक्षय नाळे उद्योजक आकाश नाळे यांनी दहावी बारावीच्या परीक्षेत यश (chinchwadenagr )मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. ग दि माडगूळकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम पार पडला.
मनविसे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, मनविसे शहराध्यक्ष अनिकेत प्रभु मनसे जनहित कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजु भालेराव, उपविभाग अध्यक्ष नितीन चव्हाण मनसे नेते नाथा शिंदे ,जितेश वाल्हेकर ,विष्णु चावरिया तसेच प्रभागातील गुरुगणेश शाळा प्राचार्य मारकड सर ,फत्तेचंद जैन शाळेचे शिक्षक वृंद पितळीया सर ,नाळे सर ,जैन सर ,राऊत मॅडम, चोरडिया सर ,
तसेच डॉ .अभिषेक पवार , स्वप्नील भुजबळ उपस्थित होते.

यावेळी राजेश अवसरे याचे मार्गदर्शन घेण्यात आले. यामधुन विद्यार्थ्यांना पुढील जीवनात कोणत्या संधी निर्माण होतील तसेच पुण्यातील महत्त्वाची महाविद्यालये यावर चर्चा झाली. यानंतर अक्षय बबनराव नाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नंतर प्रभागातील 70 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मनविसे ओंकार पाटोळे, सचिव शरण्य पाटने, हर्षल कोळेकर ,आकाश सगरे ,रुद्र बैरागी हे उपस्थित होते. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी सेनेचे सचिव अक्षय नाळे , उद्योजक आकाश नाळे , यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महेश बडगुजर ,परमेश्वर त्रिमले ,सागर पाटील ,नावेद शिकलगार ,दादा माटे ,संतोष मोरे ,फैयजन मासुमदार ,अभिषेक थोरात प्रयत्न केले..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading