Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याची चर्चा, त्याचा नंबर वरचा; पण काय असणार फायनल ट्विस्ट?

Bigg Boss Marathi New Season Day 11 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य आता खऱ्या अर्थाने आपला कमाल खेळ खेळू लागले आहेत. घरातील प्रत्येक सदस्य सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. पण आता’बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याची चर्चा आहे, त्याचा नंबर वरचा आहे. ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाचा नवा सीझन सुरू होऊन दहा दिवस पूर्ण झाले असून दहाही दिवस प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन सुरू आहे. क्षणाक्षणात नवा ट्विस्ट येत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात कधी काय ट्विस्ट येईल हे कोणी सांगू शकत नाही. आता टास्कदरम्यान घरातील सदस्य धडपड करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये अंकिता बिग बॉसने दिलेला आदेश वाचत म्हणतेय,”या घरात ज्याची चर्चा आहे, त्याचा नंबर वरचा आहे. आपणा सर्वांना चर्चेत नसणाऱ्या जोड्यांना नॉमिनेट करायचं आहे. त्यानंतर घरातील सदस्य पॅडी, सूरज, योगिता, निक्की, घन:श्याम ही नावे घेताना दिसून येत आहेत. तर वर्षा ताई म्हणत आहेत,”माझ्या निर्णयाशी मी ठाम आहे”. त्यानंतर अंकिता पुढे म्हणते,”परंतु इथेच येतो माझा आवडता ट्विस्ट”.

आता ‘बिग बॉस’ काय ट्विस्ट आणणार हे जाणून घेण्याची ‘बिग बॉस’प्रेमींना उत्सुकता लागली आहे. एकंदरीत आजचा भाग खूपच उत्साहवर्धक आणि मनोरंजक असणार आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये कोणते सदस्य सर्वाधिक चर्चेत आहेत हे प्रेक्षकांना माहिती आहे. पण घरातील सदस्यांना कोण सर्वाधिक चर्चेत वाटतं हे आजच्या भागात कळेल.

‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर.

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading