Saturday, May 9, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकांच्या घराची लूटमार

ढाका: वृत्तसंस्था 

बांगलादेश हा पूर्व बंगाल अर्थात पाकिस्तानचा भाग असताना अल्पसंख्यांक हिंदू आणि बांगलादेशवादी यांच्यावर झालेल्या अत्याचारांची पुनरावृत्ती बांगलादेशात होत आहे. अल्पसंख्यांकांच्या घराची लूटमार करण्यात येत असून त्यांची घरे आणि दुकाने जाळण्यात येत आहेत. 

बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या विरोधात हिंसक आंदोलनानंतर अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन भारतातील आगरताळा येथे आश्रय घेतला आहे. लष्कराने सत्ता ताब्यात घेतली असली तरीही अद्याप हिंसाचाराला आळा घालण्यास त्यांना यश आलेले नाही. 

देशातील 27 जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्यांक हिंदू समाजाची घरे, दुकाने आणि मंदिरांचा विध्वंस सुरू आहे. घर आणि दुकानांची लूट करून नंतर ती जाळली जात आहेत. मंदिरांची तोडफोड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मेहेरपूर येथील इस्कॉन मंदिर उद्ध्वस्त करून नंतर जाळले गेल्याची छायाचित्र समाजमाध्यमातून प्रसिद्ध झाली आहेत.

बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्यांमुळे येथील हिंदू समाज चिंताग्रस्त आणि दहशतीखाली असून बांगलादेशाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आणि अल्पसंख्यांक समाजाचे जीवन सुरक्षित करण्यासाठी भारताने हस्तक्षेप करावा, अशी त्यांची मागणी आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading