फॉसिलचे रिटेल विस्तारीकरण : पुण्यातील फिनिक्स मॉल मध्ये नवीन स्टोअर ची सुरुवात
पुणे : आपले अस्तित्व आणि स्थान अधिक सक्षम करण्यासाठी फॉसिल या लाईफस्टाईल अक्सेसरीज क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आघाडीच्या ब्रॅन्ड तर्फे पुण्यातील फिनिक्स मॉल ऑफ दि मिलेनियम येथे आपल्या नवीन रिटेल स्टोअरच्या सुरुवातीची घोषणा केली. या वाढी मुळे आता फॉसिलचा ब्रॅन्ड अनुभव अधिकाधिक ग्राहकांपर्यंत तसेच देशभरांतील नवनवीन बाजारपेठांमध्ये उपलब्ध करुन देण्याची वचनबध्दता अधोरेखित होत आहे.
फॉसिल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जॉन्सन व्हर्गिस यांनी नवीन स्टोअरच्या सुरुवातीबद्दल खूपच उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले “ एक सातत्याने बदलणारे शहर म्हणून पुण्यात फॅशन आणि लाईफस्टाईल उत्पादनांच्या मागणीत वाढ होत असून पुण्यातील लोकांना उत्पादने आवडली आहेत. म्हणूनच या बाजारपेठेत आमचे अस्तित्व वाढवून लोकांच्या आवडीच्या अशा फिनिक्स मॉल ऑफ दि मिलेनियम मध्ये आमचे स्टोअर सुरु केले असून यामध्ये आता ग्राहकांना घड्याळे, ॲक्सेसरीज, हँडबॅग्ज आणि अशा अनेक गोष्टींची आधुनिक श्रेणी मिळू शकेल. आमच्या वाढीचा प्रवास सातत्याने सुरु ठेवण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि पुण्यातील ग्राहकांना आम्ही आमच्या नवीन रिटेल ठिकाणी भेट देण्यास आमंत्रित करत आहोत.”
नवीन स्टोअरचे वैशिष्ट्य म्हणजे येथे ग्राहकांना फॉसिलच्या सिग्नेचर उत्पादनांची श्रेणी असून यांत घड्याळे, हॅन्डबॅग्ज आणि अन्य ॲक्सेसरीज असून यामुळे ग्राहकांना खरेदीचा अनोखा अनुभव मिळेल. या नवीन स्टोअर मुळे फॉसिल इंडिया ने भारताच्या पश्चिम भागात आपली पोहोच वाढवण्याचे लक्ष्य समोर ठेवले असून यामुळे हा ब्रॅन्ड देशातील आघाडीचा लाईफस्टाईल ब्रॅन्ड बनू शकेल.
पुण्यातील हे नवीन स्टोअर्स सुरु झाल्यानंतर फॉसिलचे हे देशातील २४ वे एक्सक्लुझिव्ह रिटेल स्टोअर बनले आहे. फॉसिल ने संरचनात्मक रित्या आपले रिटेल अस्तित्व वाढवले असून यामध्ये विचारपूर्वक डिझाईन केलेल्या जागा या ब्रॅन्डची परंपरा आणि नाविन्य दर्शवतात. फॉसिल एकीकडे भारतात सातत्याने वाढ करत असतांना कंपनी ने अजोड उत्पादने आणि अनुभव देऊन ग्राहकांच्या जीवनशैलीतही सुधारणा केली आहे.
