‘बिग बॉस मराठी’च्या घरात होणार अरबाज आणि निक्कीमध्ये होणार कल्ला!
‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवीन सीझनने नवा ट्विस्ट घेतला आहे. पहिल्याच दिवसापासून अनेक वाद पाहायला मिळत आहेत. तसेच काही मजेदार टास्क आपण घरात पाहत आहोत. घरात सध्या दोन गट पडले असून नुकत्याच आलेल्या प्रोमोत पाहायला मिळतं आहे की, बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्कीमध्ये वाद होणार आहेत.
समोर आलेल्या प्रोमोत दिसतंय की, एक गट गॉसिप करत दिसत आहे.. आणि त्याचं गॉसिपमध्ये अरबाज म्हणताना दिसतं आहे की,” जर येवढे नाजूक असला तर नका खेळू घरी बसा.. मुद्दे उगाच काढू नका… त्यावर निक्की म्हणाली की, ” पण का बोललास तर…. अरबाज म्हणाला तू तिची साईड घेऊ नकोस आणि घ्यायची असेल तर पुर्ण घे.. तर निक्की म्हणाली की , मला घमंड दाखवू नकोस… असा निक्की आणि अरबाजमध्ये मतभेद होऊन ठिणगी पेटते. या गॉसिपमध्ये ते कोणाविषयी बोलत आहेत हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक असतीलच. तर अरबाज आणि निक्कीमध्ये पडलेली ठिणगीचा वणवा होणार का? हे पाहणं मनोरंजनात्मक असणार आहे.
गॉसिप कोणाविषयी करत आहेत. अरबाज आणि निक्कीमधील वाद वाढणार का? हा कल्ला जाणून घ्यायचा असल्यास आजचा एपिसोड पाहावाच लागेल.
‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर.
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
