प्रो गोविंदा लीगसाठी संघांची उत्साही वातावरणात निवड
मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या २०२४ मौसमासाठी संघांची निवड आणि नामांकन समारंभ बांद्रा येथील ताज लॉन्स हॉटेल मध्ये अत्यंत उत्साही वातावरणात पारपडला.यावेळी सर्व संघ मालकांनी आपापल्या संघांची निवड करताना स्पर्धेचा थरार सर्वोच्च स्तरावर नेला. शेकडो गोंविदांचा सहभाग असलेली ही स्पर्धा १८ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडणार आहे.
यावेळी प्रो गोविंदा लीगचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रताप सरनाईक, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, डोम एंटरटेनमेंट व्यवस्थापकीय संचालक व सिनेयुग समूहाचे संचालक मजहर नडीयादवाला, डोम एंटरटेनमेंट व सिनेयुग समूहाचे अध्यक्ष व संचालक मोहमद मोरानी आणि सर्व १६ फ्रँचायझीचे मालक उपस्थित होते.
कोकण जायंटस हा या लीगमधील निवड झालेला पहिला संघ ठरला. जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्सचे मालक नलीन गुप्ता यांनी संघाची हिरवी जर्सी काढली. कोकण जायंटस संघ कोकण नगर गोविंदा पथकाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यापाठोपाठ पीआरएस इन्फ्राचे प्रतीक शेळके यांनी सातारा सिंघम्सचे अनावरण केले. सातारा सिंघम्स संघ पहिल्या मोसमातील जय जवान गोविंदा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
ईगल इन्फ्रा संघाचे मालक विनय चुग यांनी यश गोविंदा पथकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लातूर लिजेंडस संघाचे अनावरण केले. तर, आसपेक्ट्स स्पोर्ट्स च्या अक्ष कंबोज यांनी अष्टविनायक गोविंदा पथकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमरावती ग्लॅडिएटर्सचे अनावरण केले.
रणजित सिंग बिंद्रा आणि मिका सिंग यांनी श्री आगरेश्वर गोविंदा पथकाच्या नाशिक चॅलेंजर्स संघाचे अनावरण केले. तर गजानन कन्स्ट्रक्शनचे मालक विजय पटेल यांनी शिव गणेश गोविंदा पथकाच्या छत्रपती संभाजी नगर वॉरियर्स संघाचे अनावरण केले. सीओबीएक्स गेमिंगचे मालक रोहन गुप्ता आणि सौ अनुष्का गुप्ता यांनी रायगड रॉयल्स संघाच्या जर्सीचे अनावरण केले. हा संघ हिंदू एकता गोविंदा पथकाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
त्यानंतर पॅलेडियन पार्टनर्स समुहाने ओम ब्रम्हानंद साई गोविंदा पथकाच्या सेंट्रल मुंबई संघाच्या जर्सीचे अनावरण केले.
सर्वांची उत्सुकता ताणनाऱ्या श्रीराम ह्युंदाई संघाचे मालक सिध्देश कदम यांच्या निराभाईंदर योद्धाज संघाच्या निवडीने आणखीनच वाढली. बाल उत्साही गोविंदा संघ योद्धाजचे प्रतिनिधीत्व करतो. आणखी एका औचुक्यपुर्ण निवडित कंधारी समुहाच्या अर्जुन कंधारी यांनी ओम साई सेवा गोविंदा पथकाच्या नवी मुंबई स्ट्रायकर्स संघाचे अनावरण केले.
बॉलिवूड मधील प्रसिद्ध मिट ब्रदर्स आणि टेलिव्हिजन स्टार अर्जुन बिजलानी यांनी सनसनाटी कामगिरी करणाऱ्या विघ्नहर्ता गोविंदा पथकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुणे पँथर्स संघाचे अनावरण केले.
मेल स्टार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या मोहित सिंघल यांनी बालविर गोविंदा पथकाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या कोल्हापूर किंग्स संगाहच्या जर्सीचे अनावरण केले.
शिवसाई क्रिडा गोविंदा पथकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपुर निंजाज संघाच्या जर्सीचे अनावरण जे पी इन्फ्रा रियालिटी कंपनीच्या विजय जैन यांनी केले. तर रोमांचकारी कामगिरी करणाऱ्या आर्यन्स गोविंदा पथकाच्या ठाणे टायगर्स संघाचे अनावरण डीजीएम समुहाच्या गोपाल लालवानी यांनी केले. तर, कोणार्क समुहाचे मालक धीरज जेठानी बारामती ब्लास्टर्स संघाच्या जर्सीचे अनावरण करून सोहळ्याचा समारोप केला.
डोम एंटरटेनमेंट व सिनेयुग समूहाचे अध्यक्ष व संचालक मोहमद मोरानी म्हणाले की, प्रो गोविंदा लीग स्पर्धेशी जोडले गेल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटत आहे. दही हंडी सारख्या अस्सल देशी खेळाला प्रोत्साहन देता येत असल्याचा आम्हाला आनंद वाटत आहे. आज निवड झालेल्या सर्व १६ संघांमधील खेळाडू अतिशय गुणवान असून त्यांच्यातील संघ भावना व स्पर्धात्मक वृत्तीमुळे ही स्पर्धा अतिशय चुरशीची होणार आहे, अशी मला खात्री वाटते.
डोम एंटरटेनमेंट व्यवस्थापकीय संचालक व सिनेयुग समूहाचे संचालक मजहर नडीयादवाला म्हणाले की, आजच्या संघ निवडीला मिळालेल्या प्रतिसादामुळे प्रो गोविंदा लीग स्पर्धेतील गुणवत्ता सिद्ध झाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांसाठी एक व्यासपीठ उभारण्याचा आमचा मानस आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व १६ संघांना शुभेच्छा.
प्रो गोविंदा लीगचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, दही हंडी हा खेळ समृद्ध भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करतो व विविध क्षेत्रातील नागरिक या स्पर्धेमुळे एकत्र येत असतात. आजच्या यशस्वी संघ निवडीमुळे प्रो गोविंदा लीगसाठी नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे.
युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक म्हणाले की, आजच्या संघ निवडीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहिल्यामुळे आगामी मोसमाला मिळणारा प्रतिसाद सिद्ध होत असून दही हंडीला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे आमचे लक्ष्य नक्कीच पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास वाटत आहे. प्रो गोविंदा लीग २०२४स्पर्धा १८ ऑगस्ट रोजी मुंबई येथील वरळी येथे डोम एसव्हीपी स्टेडियम येथे पार पडणार आहे.
