होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे पुणे, महाराष्ट्र येथे बिगविंगचे उद्घाटन
पुणे : देशभरात विस्तार करण्याच्या आणि या प्रदेशातील प्रीमियम मोटरसायकल क्षेत्राची समीकरणे नव्याने प्रस्थापित करण्याच्या हेतूने होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. (एचएमएसआय) कंपनीला पुणे, महाराष्ट्र येथे प्रीमियम बिग बाइक विक्री आणि सेवा दालन – होंडा बिगविंगचे उद्घाटन करताना अभिमान वाटत आहे.
मोटरसायकल प्रेमींसाठी सध्याचा काळ क्रांतीकारी असून त्याच्या आघाडीवर राहात कंपनीने सुरू केलेली नवी बिगविंग डीलरशीप सर्वोत्तमाच्या शोधात असलेल्या रायडर्सना समग्र अनुभव देण्यास उत्सुक आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या या अत्याधुनिक डीलरशीपच्या माध्यमातून नव्या तसेच संभाव्य ग्राहकांमध्ये #GoRidin स्पिरीट विकसित होण्यास मदत होईल.
देशाच्या कानाकोपऱ्यातील अस्तित्व विस्तारण्यासाठी आणि संभाव्य ग्राहकांना सेवा देण्यासाठी बिगविंग आता भारतातील १४० पेक्षा जास्त टचपॉइंट्सवर कार्यरत आहे.
प्रीमियम अनुभव
कृष्णधवल मोनोक्रोमॅटिक थीम असलेल्या बिगविंगमधे सर्व गाड्या दिमाखदार पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. उत्पादन किंवा अक्सेसरीजसंबंधित ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशिक्षित, कुशल व्यावसायिकांची नेमणूक करण्यात आली आहे. गाडीच्या शोधापासून खरेदीपर्यंतचा प्रवास सोपा करण्यासाठी (www.HondaBigWing.in) वर तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. संकेतस्थळावरील ऑनलाइन नोंदणीचा पर्याय ग्राहकांना फक्त काही क्लिक्सच्या मदतीने जलद, सफाईदार व पारदर्शक अनुभव देतो. ग्राहकांचा अभिप्राय तत्काळ नोंदवणारे होंडा बिगविंग सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही सक्रिय आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी व त्यांची सुरक्षितता जपण्यासाठी होंडा बिगविंगने इमर्सिव्ह डिजिटल एक्सपिरियन्सची सुरुवात केली आहे. या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांना मोटरसायकलची संपूर्ण श्रेणी, रायडिंग गियर्स व अक्सेसरीज घरबसल्या बारकाईने पाहाता येतात.
वैविध्यपूर्ण उत्पादन श्रेणी
होंडाच्या प्रीमियम मोटरसायकल रिटेल फॉरमॅटमध्ये मोठ्या शहरांत बिगविंग टॉपलाइन – संपूर्ण प्रीमियम मोटरसायकल श्रेणी (३०० सीसी- १८०० सीसी) आघाडीवर आहे. बिगविंग इतर शहरांतील मध्यम आकाराच्या मोटरसायकल क्षेत्रात (२०० सीसी- ५०० सीसी) आघाडीवर आहे. कंपनीच्या वैविध्यपूर्ण मोटरसायकल श्रेणीमध्ये नवी CB350, H’ness CB350, CB350RS, CB300F, CB300R, NX500, XL750 Transalp, आफ्रिका ट्विन आणि गोल्ड विंग टुर यांचा समावेश आहे. त्याशिवाय हॉर्नेट २.० आणि CB200X याही आता बिगविंग शोरूम्सद्वारे रिटेल केल्या जात आहेत.
नव्या NX500 सह ग्राहकांसाठी नवा अनुभव देणार
एचएमएसआयने २०२४ वर्षाची सुरुवात NX500’ अडव्हेंचर टुअरर लाँच करत केली. या गाडीची किंमत रू. ५,९०,००० (एक्स शोरूम) ठेवण्यात आली आहे. ‘डेली क्रॉसओव्हर’ या डिझाइन थीमसह तयार करण्यात आलेले हे नवे मॉडेल सीबीयू* (कम्प्लीटली बिल्ट- अप) मार्गाने भारतीय बाजारपेठेत येणार आहे.
नव्या होंडा NX500 मध्ये ४७१ सीसी, लिक्विड- कुल्ड, ४- स्ट्रोक डीओएचसी इंजिन, पॅरलल ट्विन सिलेंडर बसवण्यात आले आहे, जे योग्य समतोल आणि उर्जादायी हाय रेविंग आणि झॅपी टॉप एंडसह दमदार कामगिरी करते. ही मोटर ३५ केडब्ल्यू उर्जा, ८६०० आरपीएम आणि ४३ एनएम पीक टॉर्क देते. यामध्ये ६ स्पीड गियरबॉक्सही देण्यात आला आहे.
संपर्क
| होंडा बिगविंग
पुणे दक्षिण (महाराष्ट्र) |
शोरूम आणि वर्कशॉप – होंडा बिगविंग पुणे दक्षिण (यश ऑटोमोबाइल), क्रोम मॉल शॉप नं. १, विजय सेल्सच्या शेजारी, हडपसर , पुणे – 411013 (महाराष्ट्र) |
