एअरटेलने महाराष्ट्रातील अतिरिक्त 1.1 मिलियन घरांमध्ये वाय-फाय सेवेचा विस्तार केला आहे
पुणे: भारती एअरटेल (“एअरटेल”) ही भारतातील अग्रगण्य दूरसंचार सेवा पुरवठादारांपैकी एक आहे आणि महाराष्ट्रातील अतिरिक्त 1.1 मिलियन नवीन घरांमध्ये वाय-फाय सेवा पोहोचवलेली आहे, असे तिने आज जाहीर केलेले आहे.
एअरटेल वाय-फाय सोबत ग्राहकाला हाय-स्पीड विश्वासार्ह वायरलेस इंटरनेट सेवाच तर मिळतेच, त्याच सोबत इतर अनेक फायदे सुद्धा मिळतात ज्यांमध्ये अमर्यादित स्ट्रीमिंग, 20+ ओटीटी सेवा आणि 350+ टीव्ही चॅनल्स यांचा समावेश आहे. ग्राहकांना एअरटेल थँक्स ॲप वापरून किंवा 8130181301 या क्रमांकावर कॉल करून ऑर्डर देता येईल व एअरटेल वाय-फाय बुक करता येईल.
जॉर्ज मॅथेन – सी.ई.ओ, रेस्ट ऑफ महाराष्ट्र, भारती एअरटेल, म्हणाले की, “एअरटेल वाय-फाय आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे असे मी आनंदाने जाहीर करत आहे. एअरटेल वाय-फायच्या मदतीने ग्राहकांना मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध होतील ज्यात सामील आहेत – 20+ ओटीटी, 350+ टेलिव्हिजन चॅनल्स आणि विश्वासार्ह हाय-स्पीड वायरलेस वाय-फाय सेवा यांचा समावेश आहे. हे ग्राहकांना रु. 699 पासून सुरू होत असलेल्या परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. ग्राहक याचा जास्तीत जास्त फायदा करून घेतील व असीमित (अनंत) मनोरंजनाचा आनंद उचलतील, अशी आम्हाला आशा आहे.”
एका नजरेत प्लॅन्स पुढील प्रमाणे आहेत :
| Tariff | Speed | Benefits | Other Benefits | |
| ₹699 | Up to 40 Mbps | 350+ TV channels (HD included) | Disney+ Hotstar, 20+ OTTs & much more | |
| ₹899 | Up to 100 Mbps | 350+ TV channels (HD included) | Disney+ Hotstar, 20+ OTTs & much more | |
| ₹1099 | Up to 200 Mbps | 350+ TV channels (HD included) | Amazon Prime, Disney+ Hotstar, 20+ OTTs & much more | |
| ₹1599 | Up to 300 Mbps | 350+ TV channels (HD included) | Netflix, Amazon Prime, Disney+ Hotstar, 20+ OTTs & much more | |
| ₹3999 | Up to 1 Gbps | 350+ TV channels (HD included) | Netflix, Amazon Prime, Disney+ Hotstar, 20+ OTTs & much more |
महाराष्ट्रातील ग्राहकांना काही आघाडीचे मराठी टीव्ही चॅनल्स आणि लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म अमर्याद पद्धतीने पाहता येतील. या चॅनल्समध्ये सामील आहेत – झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सोनी मराठी आणि डीडी सह्याद्री. लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म मध्ये इतरांमध्ये सामील आहेत – इरॉस नाऊ, हंगामा, ॲमेझॉन प्राइम, डिस्ने+ हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स.
