Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

उरण हत्याकांड : शाळेपासूनची ओळख, लग्नाला नकार अन् यशश्रीची हत्या; आरोपीने दिला कबुली जबाब 

मुंबई : उरणमध्ये झालेल्या हत्याकांडानं संपू्र्ण महाराष्ट्र  हादरुन गेला आहे. यशश्री शिंदे या 21 वर्षीय मुलीची तिचा मित्र दाऊद शेखने धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. आरोपीला काल (दि. 30) पोलिसांनी कर्नाटकातील गुलबर्ग्यातून अटक केलीअसून; लग्नाला नकार दिल्याने आरोपीने यशश्रीची हत्या केली असल्याची कबुली दाऊदने दिली आहे.

शाळे पासूनची ओळख – 

दाऊद आणि यशश्री दोघे एकमेकांना 2015 पासून ओळखत होते. दोघं शाळेत एकत्र होते. शाळा संपल्यानतंर यशश्री कॉलेजला जाऊ लागली. दरम्यान दाऊद तिला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. या सगळ्याला यशश्रीच्या आई-वडिलांचा विरोध होता. 2019 मध्ये यशश्री अल्पवयीन असल्यानं तिच्या वडिलांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत दाऊदविरोधात तक्रार केली. या गुन्ह्या अंतर्गत दाऊद जेलमध्ये गेला. कोविडकाळात तो बेलवर सुटला. काही काळाने त्याने पुन्हा यशश्रीला संपर्क केला. दाऊद यशश्रीला भेटण्यासाठी वारंवार आग्रह करत होता. तुझे फोटो व्हायरल करेन अशा धमक्या द्यायचा. दोघं एकमेकांच्या संपर्कात होते, मात्र यशश्रीचा त्याला भेटण्याला विरोध असायचा. काही वेळा यशश्रीने दाऊदचा नंबर देखील ब्लॉक केला होता.

यशश्रीची हत्या पूर्वनियोजित कट –

दाऊद मित्रांच्या फोन वरून यशश्रीला कॉल करायचा व भेटण्यासाठी बोलवायचा. त्यावर ठरल्या प्रमाणे 22 जुलै रोजी यशश्रीला भेटण्यासाठी तो बेंगळुरूहून निघाला. आपल्यासोबत त्याने एक धारदार शस्त्र देखील आणलं होतं.  23 जुलै रोजी तो नवी मुंबईत आला. आल्यावर तो दोन दिवस यशश्रीला भेटण्यासाठी बोलवत होता. मात्र, यशश्री भेटायला तयार नव्हती. यावर दाऊद ने त्याच्या जवळचे तिचे फोटो व्हायरल करायची धमकी दिली. तेव्हा 25 जुलैला यशश्री व दाऊद भेटायचे ठरवले. साधारण 1-2 तास दोघं भेटले, त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. तो तिला आपल्यासोबत पळून येण्यास जबरदस्ती करत होता. लग्न करुन बेंगळुरूला राहू, तिकडे नवीन संसार थाटू, असा आग्रह त्याने धरला होता. मात्र यशश्री या सगळ्याला तयार नव्हती. तिचा नकार होकारात बदलला नाही हे पाहून त्याने तिच्यावर त्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात यशश्रीचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading