वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच IAS पद काढून घेतलं
मुंबई : बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून आयएएस (IAS) परीक्षा उत्तीर्ण केल्या प्रकरणी UPSC ने वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आहे. तसेच त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा/निवडींमधून कायमची बंदी घालण्यात आली आहे. पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आली होती. त्यांचे उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही कारवाई केली आहे.
दरम्यान, पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीने कारवाई केल्यानंतर आता पोलिस त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे.पूजा खेडकर यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 30 जुलैपर्यंत वेळ देण्यात आली होती. मात्र, तयांच्या कडून कोणतेच उत्तर ना आल्याने आता यूपीएससीने कारवाई केली आहे.
