Thursday, September 24, 2026
BusinessLatest NewsTECHNOLOGY

निकॉन तर्फे पुण्यात जगातील पहिला अंशत: स्टॅक्ड सेन्सर Z6lll कॅमेरा सादर

पुणे  : निकॉन कॉर्पोरेशनची 100 टक्के उपकंपनी असलेल्या निकॉन इंडिया प्रा.लि.तर्फे पुण्यातील नोवोटेल हॉटेल येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात आपला बहुप्रतिक्षित कॅमेरा Z6lll सादर करण्यात आला. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीची कला पुन्हा परिभाषित करण्यासाठी फुल फ्रेम मिररलेस कॅमेरा पोर्टफोलिओशी आपली बांधिलकी याद्वारे निकॉन इंडिया ने अधोरेखित केली आहे. Z9 आणि Z8 मॉडेल्समधील इन कॅमेरा रॉ आणि एन-लॉग व्हिडओ, एक्सपीड7 प्रोसेसर यांसारखी वैशिष्टये समाविष्ट केल्याने हा नवीन कॅमेरा उत्कृष्ट कार्यप्रदर्शन करतो. Z6lll जगातील पहिला अंशत: स्टॅक्ड सीएमओएस सेन्सर आणि उत्कृष्ट ऑटो फोकस क्षमतेसह विकसित केला गेला आहे, ज्यामुळे हा कॅमेरा उत्कृष्ट कामगिरी करण्यास सज्ज आहे.

याप्रसंगी बोलताना निकॉन इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक सज्जन कुमार म्हणाले की, उच्च कार्यक्षमता फुल फ्रेम मिड सेगमेंट Z6lll कॅमेरा सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हा कॅमेरा आमच्या Z8 आणि Z9 मॉडेल्समधील नाविन्यपूर्णतेचा वारसा पुढे नेतो. अनोखी वैशिष्टये आणि अद्वितीय कामगिरीसह Z6lll व्यावसायिक आणि कॅमेरा प्रेमी लोकांसाठी व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी क्षेत्राला पुन्हा परिभाषित करण्यासाठी सज्ज आहे. इमेजिंग तंत्रज्ञानातील सर्वोत्कृष्ट अविष्कारांपैकी एक असलेल्या या कॉम्पॅक्ट आकाराच्या व्यावसायिक कॅमेरामध्ये जगातील पहिला अंशत: स्टॅक्ड सेन्सर आहे. याबरोबरच आम्ही 5.7 एम.च्या रिझोल्युशनसह उद्योग क्षेत्रातील पहिला तेजस्वी इलेक्ट्रॉनिक विव्ह्यू फाइंडर (ईव्हीएफ) सादर केला आहे.  Z6lll 6के/60 पी,फुल एचडी 240 पी आणि बिल्ट इन एन-लॉग,एन-रॉ सपोर्टसह उच्च गुणवत्ता व्हिडिओ निर्मिती क्षमता प्रदान करतो. नवीन निकॉन Z6lll ऑटोफोकस अचूकतेसह आणि अतिजलद 120 एफपीएस प्री रिलीज कॅप्चर व 20 एफपीएस निरंतर शुटिंग रेट सह क्रिएटर समुदायासाठी अविभाज्य साधन ठरेल.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना नवीन निकॉन Z6lll अनुभव घेता आला. यावेळी उत्पादनाची विशेषता अधिक जाणून घेता आली. तसेच वेडिंग,फॅशन आणि ॲक्शन शैलीचे चित्रण करणाऱ्या लाईव्ह एक्सपिरियन्स झोनवर लक्ष केंद्रित करताना कॅमेरा हाताळण्याची संधी देखील मिळाली.

निकॉन Z6lll मधील ग्राऊंडब्रेकिंग लाईटनिंग-फास्ट एक्सपीड 7 प्रोसेसिंग इंजिनमुळे अचूक आणि स्पष्टतेसह क्षणभंगुर करणारे फोटो टिपता येणार आहेत. निकॉनच्या उच्च स्तरीय मॉडेल्समधून उत्कृष्ट कार्यप्रदर्शन व कार्यक्षमता लक्षात घेत Z6lll मध्ये कमी प्रकाश असलेली स्थिती आणि बॅकलिट दृश्यांमध्ये देखील उत्कृष्ट कार्यप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. हा कॅमेरा 9 विषय प्रकार शोधू शकतो आणि विविध ऑटोफोकस कार्यप्रदर्शनाबरोबरच आधीच्या उत्पादनांपेक्षा अधिक एएफ अचूकता देखील प्रदान करतो. कमी प्रकाशात देखील उत्कृष्ट कार्यक्षमता आणि अनोख्या नवीन फंक्शन्ससह Z6lll सर्जनशील छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर्ससाठी अधिक सुयोग्य आहे.

उपलब्धता

Z6lll कॅमेरा बॉडी 25 जून 2024 पासून रूपये 2,47,990/-किमतीत निकॉन आऊटलेटवर उपलब्ध आहे. Z6lll च्या खरेदीवर 27,000 रूपयांची विशेष ऑफर मिळणार असून ज्यामध्ये एंजलबर्ड एव्ही प्रो सीफेक्सप्रेस बी एसई 512 जीबी किंवा एसएक्स 160 जीबी कार्ड अतिरिक्त बॅटरी आणि चार्जरचा समावेश आहे. ऑस्ट्रिया आधारित एंजलबर्ड कॅमेरा विशिष्ट मीडिया कार्डस्‌‍ आणि स्टोरेज सोल्युशन्स तयार करतो,जे कोणत्याही वातावरणात वापरू शकतो आणि यामुळे फोटोग्राफर्सना आत्मविश्वासाने आपले लक्ष्य साध्य करता येऊ शकते. सृष्टी डिजीलाईफ ही भारतातील एंजलबर्ड मीडियाची एकमेव वितरक असून अद्ययावत सोल्युशन्सची उपलब्धता येथे प्रदान केली जाते. नवीन Z6lll आणि इतर निकॉन उत्पादनांबद्दल अधिक माहितीसाठी कृपया https://www.nikon.co.in येथे भेट द्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading