‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांचे पहिल्याच दिवशी पळणार तोंडचं पाणी; नेमकं काय घडलं?
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर दिमाखात पार पडला असून आपल्या रितेश भाऊने सर्व स्पर्धकांचं त्याच्या स्टाईलने स्वागत केलंय. आता घरातील 16 सदस्य त्यांच्या स्टाईलने खेळ कसा रंगवणार आणि रितेश भाऊ कसा कल्ला करणार हे प्रेक्षकांना आजपासून पाहायला मिळेल. पण ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांचे पहिल्याच दिवशी तोंडचं पाणी पळणार आहे. घरात पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनच्या पहिल्या एपिसोडचा पहिला प्रोमो नुकताच आऊट झालाय. प्रोमोमध्ये पहिल्याच दिवशी घरात पाणी येत नसल्याने सदस्यांची अडचण झालेली पाहायला मिळत आहे. “पाणी सगळं गेलेलं आहे, ‘बिग बॉस’ पाणी, सगळ्यात आधी आंघोळ करायची असते तर त्याच्यासाठी पाणी नाही, असं म्हणत स्पर्धक ‘बिग बॉस’ला पाणी सोडण्यास सांगत आहेत. पाणी अत्यावश्यक बाब असल्याने घरातील सर्व सदस्य हतबल झाले आहेत. पाणी मिळण्यासाठी काकुळतीने ‘बिग बॉस’ला ते विनंती करत आहेत. त्यावर बिग बॉस म्हणतात,”आता फक्त घरातलं पाणी गेलंय…थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळेल”. त्यामुळे पहिल्याच दिवशी स्पर्धकांना मोठा धक्का बसलाय.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या घराचं दार अखेर उघडलं आहे. पण यंदा चक्रव्यूहामुळे सदस्यांना त्यांच्याप्रमाणे खेळता येणार आहे. सदस्यांचा खेळ पलटवून लावायला आणि त्यांना पेचात अडकवायला ‘बिग बॉस’ आणि रितेश भाऊ सज्ज आहेत. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांना प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजेच बेड, बाथरुम, खाण्यापिण्याच्या सामानासाठी किंमत मोजावी लागणार आहे.
पाहा मराठी मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर.
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #Endemolshine #BBM
