Saturday, May 9, 2026
Latest NewsNATIONAL

जम्मू कश्मीर मध्ये सशस्त्र सैनिकांची अतिरिक्त कुमक तैनात

नवी दिल्ली:  जम्मू काश्मीरमध्ये, विशेषतः जम्मूमध्ये वाढत्या दहशतवादी कारवायांच्या अनुषंगाने या परिसरात लष्करी हालचालींना वेग आला आहे. जम्मू कश्मीर मध्ये वेगवान हालचाली करून रातोरात 3 हजार सशस्त्र सैनिकांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. लष्कराच्या या हालचालींचा वेध घेतला असता सीमा भागात मोठी लष्करी कारवाई होण्याची शक्यता दिसून येत आहे. 

दीर्घकाळ दहशतवादी कारवायांच्या आगीत होरपळणाऱ्या काश्मीरमधील दहशतवाद लक्षणीयरीत्या घटला असला असला तरीही दहशतवादमुक्त क्षेत्र असलेल्या जम्मूमध्ये मागील काही काळापासून दहशतवादी कारवायांनी वेग घेतला आहे. मागील काही काळात दहशतवादी कारवायांमध्ये सुरक्षा यंत्रणांचे तब्बल 40 हून अधिक जवान शहीद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. 

जम्मू मध्ये सातत्याने दहशतवादी कारवाया होत असूनही गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह थंड बसून असल्याची टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. मात्र, केंद्र सरकारने या दहशतवादी कारवायांची दखल घेऊन अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. या अतिरिक्त फौजेत तब्बल 500 पॅरा कमांडो या अत्यंत धाडसी आणि घातक जवानांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवानही या तुकडीत समाविष्ट आहेत. 

दीर्घकाळानंतर जम्मूच्या सीमावरती भागात लष्करी हालचालींना वेग आला पाकपुरस्कृत दहशतवादी कारवाया निपटून काढण्यासाठी लष्कर आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून मोठी कारवाई केली जाईल, अशी चिन्हं दिसून येत आहेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading