डॉ पवन चांडक यांचा 1 लाख किमी सायकलिंग चा टप्पा पूर्ण
– कौटुंबिक वाचन व वाचनसंस्कृती जनजागृतीसाठी पुणे आळंदी पंढरपूर कुर्डुवाडी 350 किमी सायकलवारीचे आयोजन
– 10 हजार पुस्तके मोफत वाटण्याचा संकल्प
मोबाईलच्या अतिवापर मुळे लहान मुलांवर त्याचे दुष्परिणाम होत आहेत त्यामुळे मुले एकलकोंडी बनत असून कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. आजी आजोबा व नातवंडामध्ये गोष्टीतून होणारा संवाद व कौटुंबिक वाचन हरवत चालले आहे. घरा घरात होणाऱ्या कौटुंबिक वाचन ची जागा दुर्दैवाने मोबाईल व टीव्ही ने घेतली आहे. यासाठीच कौटुंबिक वाचन व वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी प्रसार व संवादाची गरज आहे. म्हणूनच पुणे – आळंदी – पंढरपूर – कुर्डुवाडी 350 किमी सायकलवारीतून विविध शाळा, कॉलेज, महाविद्यालयात संवाद साधत दि 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) चे अध्यक्ष डॉ पवन चांडक हे सायकलवर एकाकी प्रवास करणार आहेत.
*सायकलवारीचा मार्ग* : पुणे रेल्वे स्टेशन हुन 11 जुलै रोजी सकाळी सायकलिंग करत आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी चे दर्शन घेऊन लोणीकंद मार्गे जि प परिषद प्राथमिक शाळा शेलार मेमाणवाडी येथे शाळेत मार्गदर्शन करून 100 पुस्तकांची वाचनपेटी देणार आहेत. पुढे यवत, चौफुला मार्गे पाटस येथे जिल्हा परिषद शाळा पाटस येथे संवाद साधून वाचनपेटी देणार आहेत. 12 जुलै रोजी कुरकुंभ मार्गे स्वामी चिंचोली पोहोचून जिल्हा परिषद स्वामी चिंचोली शाळेत मार्गदर्शन करून आनंदी वाचनपेटी भेट देणार आहेत. पुढे इंदापूर येथे रयत शिक्षण संस्थेतील शाळा व महाविद्यालयात मार्गदर्शन करून अकलूज येथे तुकाराम महाराज पालखी चे दर्शन घेऊन वेळापूर येथे मुक्काम होईल. 13 जुलै रोजी वेळापूर हुन निघून पालवी एड्स प्रकल्प येथे संवाद साधून विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे दर्शन घेऊन कुर्डुवाडी येथे समारोप करतील.
*4 शाळेत संवाद व 100 पुस्तकांची आनंदी वाचनपेटी भेट देणार*: या सायकल मोहिमेत वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी चिंतामणी विद्या मंदिर थेऊर, जिल्हा परिषद शाळा पाटस व जि प शाळा स्वामी चिंचोली व इंदापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी येथे आनंदी वाचनपेटी भेट दिली.
*डॉ पवन चांडक यांची ही 10 वी सायकल वारी आणि 1 लाख किमी सायकलिंग चा टप्पा पूर्ण*: या पूर्वी 2013 पासून ते 2024 दरम्यान एचआयव्ही एड्स जनजागृती सोबत एचआयव्ही संक्रमित बालकांच्या मूलभूत प्रश्न जसे शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन विषयी सर्वसामान्यांमध्ये सायकलिंग मोहिमेतून संवाद साधून आजवर भारतातील 12 राज्य – महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, पंजाब, हरयाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि 4 देश ज्यात इंग्लंड, स्कॉटलंड, जर्मनी, फ्रांस आदी भागात आजवर केली आहे.
या निमित्ताने येत्या वर्षभरात वाचनप्रेमी 100 जिल्हा परिषद शाळेत प्रत्येकी 100 पुस्तके नुसार ऐकून 10,000 पुस्तके भेट देणार आहेत.
डॉ पवन चांडक 9422924861, 8329935940
