Sunday, June 7, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

सुनीता विल्यम्स आणि  बॅरी विल्मोर अंतराळातून सुखरूप परतणार पृथ्वीवर 

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : आम्ही अंतराळात सुरक्षित आहोत. स्टार लाइनर कॅप्सूल आम्हाला अंतराळातून पृथ्वीवर सुरक्षितपणे घेऊन येईल, असा विश्वास अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांनी व्यक्त केला. त्यामुळे त्यांच्या परतण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांनी सुटकेचा विश्वास टाकला आहे. दूरदृश्य प्रणाली द्वारे पत्रकार परिषद घेऊन दोन्ही अंतराळवीरांनी पृथ्वीशी संपर्क साधला.

सुनीता विल्यम्स आणि  बॅरी विल्मोर हे दोघे स्टार लाइनर कॅप्सूलद्वारे पाच जून रोजी अंतराळात झेपावले. दुसऱ्या दिवशी त्यांनी आयएसएस या अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवले. या ठिकाणी ते आठ दिवस थांबून पुन्हा पृथ्वीवर परतणार होते. मात्र, अंतराळयानातील काही त्रुटींमुळे त्यांचा अंतराळातील मुक्काम अनिश्चित काळासाठी वाढला. विख्यात अंतराळ विज्ञान संस्था नासाकडून ते सुरक्षित असल्याची ग्वाही देण्यात येत असली तरीही त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पत्रकार परिषदेतून त्यांनी संपर्क साधल्यावर चाहत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, आपण नेमके कधी परतणार हे त्यांना सांगता आले नाही. अंतराळ प्रवासात स्टार लाइनरच्या 28 पैकी पाच  विशिष्ट सुटे भाग बिघडले असून त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.

या पत्रकार परिषदेत बोलताना सुनीता विल्यम्स यांनी त्यांचा अंतराळातील अविस्मरणीय अनुभव कथन केला. त्यांनी अंतराळातून छोट्या वादळाचे मोठ्या चक्रीवादळात रूपांतर होताना पाहिले. हा अनुभव फारच विलक्षण होता, असे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading