Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

जुलै महिना लक्षवेधी घटनांचा! ‘कलर्स मराठी’वर आज रंगणार रोमांचक घडामोडी

 

‘कलर्स मराठी’साठी जुलै महिना हा लक्षवेधी घटनांचा असणार आहे. आजचा सोमवारचा दिवस प्रेक्षकांसाठी रोमांचक घडामोडींचा ठरणार आहे. ‘अंतरपाट’,’अबीर गुलाल’ आणि ‘सुख कळले’ या लोकप्रिय मालिकांमध्ये आज अनपेक्षित वळणे येणार आहेत.

‘अंतरपाट’ मालिकेत क्षितीज आणि गौतमीच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री धक्कादायक घटना घडणार आहे. क्षितीज गौतमीला सांगतो की, त्याला घटस्फोट हवा आहे. कारण त्याचं अजूनही जान्हवीवर प्रेम आहे. क्षितीजच्या या धक्कादायक वक्तव्यावर गौतमीची काय प्रतिक्रिया असेल, याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘अबीर गुलाल’ या मालिकेत भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला अगस्त्यची आई सुलोक्षणा निंबाळकर प्रमुख पाहुणी म्हणून हजेरी लावणार आहे. मात्र, कार्यक्रमात एक विचित्र प्रसंग घडणार आहे . सुलोक्षणा निंबाळकरांना सीनिअर आर्टिस्ट समजून श्री तिथे तमाशा करते. ज्यामुळे संतप्त सुलोक्षणा तिला कानाखाली मारतात. या घटनेने कार्यक्रमात गोंधळ निर्माण होतो. या सगळ्यानंतर श्रीला खरे सत्य समजेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

‘सुख कळले’ या मालिकेत माधवच्या मृत्यूनंतर घरच्या जबाबदाऱ्या पेलताना मिथिलाला अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. नव्या पात्राच्या आगमनाने मिथिलाच्या आयुष्यात काय बदल होणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

‘अंतरपाट’,’अबीर गुलाल’ आणि ‘सुख कळले’ या तिन्ही मालिकांमध्ये येणाऱ्या या अनपेक्षित आणि रोमांचक वळणांनी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ‘कलर्स मराठी’वरील सोमवारचा दिवस प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा ट्रिपल तडका देणारा ठरेल, यात शंका नाही!

पाहा सोमवार ते शुक्रवार दररोज आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही #Jio cinema वर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading