State Budget 2024 : अर्थसंकल्पात महिला व शेतकाऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प (Budget) सादर केला. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून नवनवीन घोषणा करण्यात आल्या आहेत.
वारकरी बांधवांसाठी काय ? –
- पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव
- पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंडींना प्रति दिंडी 20 हजार रूपये
- ‘निर्मल वारी’ साठी 36 कोटी 71 लाख रुपयांचा निधी
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार
महिलांसाठी करण्यात आलेल्या घोषणा –
- सन 2023-24 पासून ‘लेक लाडकी’ योजनेची सुरुवात- मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये
- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये-दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपये निधी
- दिनांक 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक
- पिंक ई रिक्षा – १७ शहरांतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य – ८० कोटी रुपयांचा निधी
- “शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह” योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान १० हजार रुपयांवरून २५ हजार रुपये
- राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी ७८ कोटी रुपये
- रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने- आण करण्यासाठी ३ हजार ३२४ रुग्णवाहिका
- जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1 कोटी 25 लाख 66 हजार 986 घरांना नळजोडणी पूर्ण- राहिलेल्या 21 लाख 4 हजार 932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर
- ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’- वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना लाभ
- लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ
- महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ‘लखपती दिदी’, या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट
- महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’- अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन
- ‘आई योजनेअंतर्गत’ पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा -10 हजार रोजगार निर्मिती
- मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित ८ लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के प्रतिपूर्ती
- या निर्णयाचा अंदाजे २ लाख ५ हजार ४९९ मुलींना लाभ-सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा भार
शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या तरतूद –
- शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे वीज माफीचा निर्णय
- शेती कृषी पंपाचे सर्व थकित बिल माफ
- 44 लाख शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होणार
- ई पंचनामा योजना राज्यभर राबवणार
- कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांच्या निधी
- 2023 – 24 साठी 5000 रुपयांची मदत होणार
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार पन्नास रुपये प्रति हेक्टरी मदत
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 200 कोटी रुपयांच्या फिरत्या निधीची तरतूद
- बांबूच्या एका रुपासाठी 175 रुपये अनुदान
- मागेल त्याला सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देणार
सामान्य नागरिकांना काय मिळाले –
- मुंबई – ठाण्यातील पेट्रोल,डीजेलच्या किमती होणार कमी
- महात्मा फुले आरोग्य योजना 1900 रुग्णालयात लागू होणार
- एक ते पाच लाखांचे उपचार मोफत केले जाणार
- आपला दवाखाना योजना सर्वत्र राबवणार
- तृतीय पंथीयांना सर्व शासकी योजनांचा फायदा मिळणार
- युवा प्रशिक्षण योजनेत दरवर्षी दहा हजार रुपयांचे विद्यावेतन
- गाव तेथे गोदाम योजना राबवणार
- अल्पसंख्याक समाजातील मुलांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
- सिंधुदुर्गमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कूबा डायविंग सेंटर उभारणार
- AI संशोधनासाठी 100 कोटींची तरतूद
- दिव्यांगांसाठी आनंद दिघे घरकुल योजना राबवणार
- ज्याची मोटार साडेसात पर्यंत त्याचा वीज बिल माफ
- शिराळमध्ये छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणार
- राज्याभिषेक सोहळ्याचा खर्च राज्य सरकार करणार
