Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

State Budget 2024: अर्थसंकल्प निवडणुकीचा नसून निर्धाराचा – देवेंद्र फडणवीस

मुंबई : युवा, महिला, दलीत, आदीवासी आशा सगळ्यांसाठीच या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याने विरोधकांचे चेहरे उतरले आहे. जे आम्ही म्हणालो आहोत ते आम्ही नक्कीच करून दाखवू. हा अर्थसंकल्प निवडणुकीचा नसून निर्धाराचा आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

अर्थमंत्री अजित पवार यांनी 10 व्यां दा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, विरोधकांचे कामच आहे टीका करणे. त्यांना जे बोलायच आहे ते ते आधीच लिहून आणतात. हा थापांचा अर्थसंकल्प नसून मायाबापांचा आहे. एक ऐतिहासिक व सर्वसमावेशक अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. लोकसभा निवडणुकीत ज्यानी खोटे नरेटीव्ह पसरवून खोटा प्रचार केला. त्याला उत्तर देणारा हा अर्थसंकल्प आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading