सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सामाजिक न्यायाचे प्रणेते, आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या कार्यक्रमात कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. (डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ) विजय खरे यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे, मुकूंद पांडे, उपकुलसचिव प्रदीप कोळी, ज्ञानेश्वर साळुंके, सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे, मयुर चोरडीया यांच्यासह शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
