Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

आजच्या पिढीतील कार्यकर्त्यांनी शाहू महाराजांच्या मार्गाने सामाजिक कार्य करावे – मोहन जोशी

पुणे : लोकाभिमुख राज्यकारभार करणारे बहुजनांचे कैवारी शिक्षण महर्षी आरक्षणाचे जनक आपत्ती व्यवस्थापनगुरु,सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते रयतेचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करीत असताना आजच्या पिढीतील कार्यकर्त्यांनी सामाजिक ऐक्य आणि सामाजिक कार्य यासाठी त्याच मार्गाने प्रयत्न केला पाहिजे असे उदगार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म.आमदार मोहन जोशी यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने काढले

सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य ,कृषी, उद्योग, कला, क्रीडा, इ. क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे बहुजनांचा आधार, कर्तव्यदक्ष राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना मानाचा मुजरा…. आज राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एस एस पी एम एस येथील त्यांच्या पुतळ्यास काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहनदादा जोशी यांच्या शुभहस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी बापुसाहेब शिंदे,अजय पाटील,आयुब पठाण,प्रशांत सुरसे,सुरेश कांबळे,चेतन अग्रवाल,रोहन सुरवसे पाटील,ॲड.निलेश बोराटे,महेंन्द्र चव्हाण,प्रथमेश लबडे,ॲड.मोनिकाताई खलाने,राजेश जाधव, व इतर कॅाग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते महाराजांना अभिवादन करण्यास उपस्थित होते..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading