देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी लोक चळवळ उभी करणार – हेमंत पाटील
पुणे : देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी भाजप सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये अनेक वचने दिलेली होती. त्या जाहीरनामाची वचनपूर्ती करण्याची सुरूवात दिल्लीमध्ये भ्रष्टाचार विरोधी लोकचळवळ उभी करून करण्यात येणार आहे. यासाठी येत्या 5 जुलै पासून दिल्ली येथे मेळावा घेवून भ्रष्टाचार विरोधी अभियान सुरूवात असल्याची माहिती, इंडिया अगेन्स्ट करप्शन चे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली आहे.
हेमंत पाटील म्हणाले, देशात भ्रष्टाचार अनेक प्रकारे वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता अशा मोठ्या शहरांमध्ये मेळावे घेवून जनजागृती करून एक लोकचळवळ उभे करण्याचे अभियान राबविणार आहोत. यामध्ये आम्ही सरकारी अधिकारी, सामान्य नागरिक व समविचारी संस्थांची संवाद साधून भ्रष्टाचार विरोधी एक नेटवर्क तयार करणार आहोत. यांची सुरूवात आम्ही येत्या 5 जुलै ला दिल्ली येथून होणार आहे. यावेळी NDA सरकारला पाठिंबा देवून आम्ही केंद्र सरकारला भ्रष्टाचार विरोधी अभियांनासाठी तीन हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करावी अशी मागणी देखील करणार आहोत.
पुढे बोलताना ते म्हणाले, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना वयोमाना नुसार काम करण्यात मर्यादा पडतात. त्यामुळे त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी मी स्वतःहून पुढे आलो आहे. येत्या काळात नक्कीच आम्ही भ्रष्टाचार विरोधी देशपातळी वरील चळवळ उभारू, असा संकल्प आहे.
