सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या दुसऱ्या सीझनच्या भव्य लिलावासाठी रायडर्स नोंदणी
पुणे : सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (आयएसआरएल) या जगातील पहिल्या फ्रँचाईझी- बेस्ड सुपरक्रॉस लीगने आज दुसऱ्या सीझनसाठी रायडर्स नोंदणी सुरू केल्याचे जाहीर केले. थरारक रेसेस आणि असामान्य गुणवत्तेनं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या शुभारंभाच्या सीझनला मिळालेल्या भरभरून प्रतिसादानंतर आयएसआरएल परत एकदा आपल्या मर्यादा ओलांडण्यासाठी सिद्ध झालं आहे.
पहिल्या सीझनने मोटरस्पोर्ट्स प्रेमींमध्ये नवी उत्सुकता निर्माण केली. या सीझनसाठी १०४ रायडर्सनी नोंदणी केली होती आणि त्यात अमेरिका, इटली, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, थायलंड व भारतासारख्या विविध देशांचे डिफेंडिंग चॅम्पियन्स सहभागी झाले होते. पहिल्या सीझनमध्ये विजयासाठी लढलेल्या आघाडीच्या नावांमध्ये मॅट मॉस – ९ वेळा ऑस्ट्रेलियन एमएक्स आणि एसएक्स चॅम्पियन, जॉर्डी टिक्सियर – वर्ल्ड चॅम्पियन एमएक्स२ (२०१४), २०२२ प्रिन्स ऑफ पॅरीस (एसएक्स२) थॉमस रॅमेट, ह्युगो मॅन्झातो, फ्रान्स, कॅलेब गौलेट, ऑस्ट्रेलियाचे रीड टेलर आणि पहिल्या सीझनच्या ८५ सीसी विभागातील सेन्सेशन थायलंडचे ब्रायन गेल्स यांचा समावेश होता.
३ वेळा भारताचे राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेले ऋग्वेद बारगुते यांनी अभिमानाने भारताचे नेतृत्व केले. त्यांच्यासह ईक्शन शानबाग, प्रज्वल विश्वनाथ, सार्थक चव्हाण आणि श्लोक घोरपडे यांचा समावेश होता.
सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे सह- संस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले, ‘दुसऱ्या सीझनसाठी आम्ही उत्सुक आहोत आणि आम्हाला विश्वास आहे, की या सीझनला शुभारंभाच्या सीझनपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळेल. भारतामध्ये सुपरक्रॉस रेसेसचं आयोजन करण्यासाठी योग्य स्टेडियम्स आणि ठिकाणे असल्यामुळे आम्हाला लीगचा सातत्याने विस्तार करणे शक्य झाले. बऱ्याच रायडर्सनी आमच्या जागतिक दर्जाच्या आणि रेसिंगचा थरारक व स्पर्धात्मक अनुभव देणाऱ्या ट्रॅक्सचा आनंद घेतला. यापूर्वीचे रायडर्स परत सहभागी होत असल्याचा आम्हाला आनंद होत आहे. नवीन रायडर्सचे स्वागत करण्यासाठीही आम्ही उत्सुक आहोत. यात सहभागी होण्यासाठी जगभरातील रायडर्स उत्सुक असल्याचा आम्हाला आनंद वाटतो. आयएसआरएल जगभरातील रायडर्सचा समूह तयार करत आहे.’
तीन वेळा राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेले ऋग्वेद बारगुजे म्हणाले, ‘सीएट आयएसआरएलच्या शुभारंभाच्या सीझनचा अनुभव अविस्मरणीय होता. मला वेगळ्या प्रकारचा प्रदेश आणि आव्हानात्मक हवामानाचा अनुभव मिळाला. विशेषतः बेंगळुरू तिथल्या मातीमुळे जास्त अवघड आहे. सर्व शहरांतील रेसेस थरारक होत्या आणि प्रेक्षकांनीही अभूतपूर्व पाठिंबा दिला. संयोजकांनी भारतातील सुपरक्रॉसमध्ये आमूलाग्र बदल करत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. दर्जेदार सुपरक्रॉस ट्रॅकवर रायडिंग करण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं. सीएट आयएसआरएलच्या दुसऱ्या सीझनसाठी मी उत्सुक आहे.’
जॉर्डी टिक्सियर, वर्ल्ड चॅम्पियन एमएक्स२ (२०१४) म्हणाले, ‘सीएट आयएसआरएलचा पहिला सीझन जबरदस्त होता. मला त्याकडून इतकी अपेक्षा नव्हती. ट्रॅक, चाहते, प्रेक्षक या सगळ्याचाच मी खूप आनंद घेतला. आयोजकांनी किती चांगल्या प्रकारे सर्व सोय केली होती, हे पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांनी रायडर्सचे ऐकून प्रत्येक रेसनंतर सुधारणा केल्या. पुणे आणि बेंगळुरूमध्ये आम्हाला फरक दिसून आला. चाहते जबरदस्त होते आणि भारतीय लोकांना सुपरक्रॉसबद्दल उत्सुकता आहे पाहून आनंद झाला. आयोजक चांगले आणि सातत्याने सुधारणा करणारे होते. पहिला सीझन अविस्मरणीय होता आणि दुसऱ्या सीझनसाठी परत येताना मी खूप खूष आहे. या सीझनमध्येही अविस्मरणीय आठवणी मिळतील अशी आशा आहे.’
रीस मोटोस्पोर्ट्सचे ब्रेंडन सिपल म्हणाले, ‘सीएट आयएसआरएचा पहिला सीझन कायम लक्षात राहाण्यासारखा होता आणि त्यात सहभागी झाल्याबद्दल मी स्वतःला सुदैवी समजतो. ट्रॅक्स आणि रेसिंग दर्जेदार होतं. चाहत्यांनी तर मजा आणली. टीम्स तसंच आयोजक सर्वोत्तम आणि प्रत्येकाच्या गरजा पुरवण्यावर भर देणारे होते, तर ट्रॅक्स अगदी परफेक्ट होते. दुसऱ्या सीझनमध्ये काय घडतंय हे पाहाण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. नव्या शहरांना भेट देण्यासाठी, सपोर्टिव्ह टीमसाठी रेसिंग करण्यासाठी आणि भारतात सुपरक्रॉसचा विकास होताना पाहाण्यासाठी मी उत्सुक आहे. परत येण्याची मी आतुरतेनं वाट पाहात आहे.’
रायडर नोंदणीमध्ये चार थरारक रेसिंग विभागांचा समावेश आहे – ४५० सीसी इंटरनॅशनल रायडर्स, २५० सीसी इंटरनॅशनल रायडर्स, २५० सीसी इंडिया- एशिया मिक्स आणि ८५ सीसी ज्युनियर क्लास. लीगने हृदयाची धडधड वाढवणाऱ्या आणि तीव्र स्पर्धा असलेल्या रेस अनुभवण्याची हमी दिली असून ऑफलाइन तसेच ऑनलाइन प्रेक्षकांना हा थरारक अनुभव घेता येणार आहे.
आगामी सीझन जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान होणार असून वेगवेगळ्या भारतीय शहरांत त्याच्या फेऱ्या होतील. फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स क्लब इन इंडिया (एफएमएससीआय) यांच्यासह आयोजित करण्यात आलेले सीएट आयएसआरएल थरार, मनोरंजन आणि तीव्र स्पर्धेचा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.
अधिक माहिती व सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या (आयएसआरएल) अद्ययावत घडामोडींसाठी भेट द्या https://
