Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

एडीपी इंडिया आणि तिच्‍या ११,७०० हून अधिक सहयोगींनी मुलांना ९००,००० भोजन देण्‍यासाठी अक्षय पात्र फाऊंडेशनसोबत केली हातमिळवणी

पुणे  – एडीपी या मानवी भांडवल व्‍यवस्‍थापनामधील जागतिक अग्रणी कंपनीने संपूर्ण भारतातील सरकारी शाळांमध्‍ये शिक्षण घेत असलेल्‍या ३७,००० मुलांना ९००,००० भोजन देण्‍यासाठी अक्षय पात्र फाऊंडेशनसोबत महत्त्‍वपूर्ण सहयोगाची घोषणा केली आहे. एडीपी इंडिया सीएसआर प्रोग्राम ‘तरंग’अंतर्गत या उपक्रमाचा संपूर्ण एका महिन्‍यासाठी या मुलांना भोजन सुविधा देण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामधून एडीपीची सामुदायिक सेवा व सामाजिक जबाबदारीप्रती अविरत कटिबद्धता दिसून येते.

हा उपक्रम एडीपी सहयोगींच्‍या निवडीमधून प्रेरित आहे, ज्‍यांनी हे दान करण्‍यासाठी कंपनीला पाठिंबा दिला आहे. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे प्रत्‍येक एडीपी सहयोगी आणि त्‍यांचे कुटुंब महिनाभर तीन मुलांना भोजन सुविधा देणार आहे.

”एडीपीमध्‍ये आमचा समाजाचे ऋण फेडण्‍यावर आणि आम्‍ही करू शकणाऱ्या सकारात्‍मक परिणामावर विश्‍वास आहे, जेथे आम्‍ही राहण्‍यासोबत कार्यरत असलेल्‍या समुदायांमध्‍ये आमचे ११,७०० हून अधिक सहयोगींचे प्रबळ कुटुंब आहे,” असे एडीपी इंडियाचे महाव्‍यवस्‍थापक व व्‍यवस्‍थापकीय संचालक विजय वेमुलापल्‍ली म्‍हणाले. ”मुलांना आहारासाठी भोजन देण्‍यासोबत त्‍यांची स्‍वप्‍नं व भविष्‍य घडवण्‍यासाठी उत्तम पोषण देणे देखील महत्त्‍वाचे आहे. मुलांना दिवसातून किमान एकदा पौष्टिक आहार उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेत आमचा विश्‍वास आहे की, आम्‍ही त्‍यांचे शिक्षण व आरोग्‍याला देखील पाठिंबा देत आहोत. आम्‍ही परिवर्तन घडवून आणण्‍याप्रती दृढ कटिबद्ध आहोत आणि मला या उपक्रमासाठी अविरत पाठिंबा दिलेल्‍या आमच्‍या सहयोगींचा अत्‍यंत अभिमान वाटतो, विशेषत: भारतात गेल्‍या २५ वर्षांपासून योगदान देणाऱ्या आमच्‍या समुदायांचे आभार व्‍यक्‍त करतो.”

”एडीपीमध्‍ये आम्‍हा प्रत्‍येकाला सर्वसमावेशक विकासाचे पालनपोषण करण्‍यामध्‍ये कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी सीएसआर)चे सर्वोत्तम परिणाम माहित आहेत. सामाजिक जबाबदारीप्रती आमच्‍या सहयोगींचा दयाळूपणा व समर्पितता अत्‍यंत प्रेरणादायी आहे. अक्षय पात्र फाऊंडेशनसोबतच्‍या या सहयोगामधून कोणतेही मूल उपाशी राहणार नाही याची खात्री घेण्‍याप्रती आमची सहयोगात्‍मक कटिबद्धता दिसून येते. आमचा या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून मुलांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल करण्‍याचा आणि उज्‍ज्‍वल भविष्‍य घडवण्‍याचा मनसुबा आहे. तसेच MIDAS, मॉडेल स्‍कूल्‍स यांसारखे इतर प्रमुख तरंग उपक्रम हैदराबाद व पुणे येथील वंचित समुदायांमधील ३५,००० हून अधिक मुलांचे शिक्षण आणि आरोग्‍यासाठी साह्य करतात. सहयोगाने, आम्‍ही भोजन देण्‍यासोबत हजारो मुलांसाठी आशा व संधी देत आहोत,” असे एडीपी प्रा. लि.चे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष व एचआर प्रमुख श्री. सुजनन वेंकटेश म्‍हणाले.

हे दान तरंगच्‍या माध्‍यमातून कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटीप्रती एडीपीच्‍या व्‍यापक कटिबद्धतेचा भाग आहे. भारतातील कार्यसंचालनांच्‍या गेल्‍या २५ वर्षांदरम्‍यान एडीपीने विविध कार्यांसाठी मोठे योगदान दिले आहेत, जसे हैदराबादमध्‍ये समुदाय सुरक्षिततेसाठी ८३ सीसीटीव्‍ही कॅमेरे बसवले, कोविड-१९ महामारीदरम्‍यान निलोफर चिल्‍ड्रेन्‍स हॉस्पिटल येथे आयसीयू वॉर्डची स्‍थापना आणि पीएम कोविड रिलीफ फंडमध्‍ये दान. अगदी नुकतेच, एडीपीने आपला मे मंथ ऑफ केअरिंग २०२४ पूर्ण केला, ज्‍यामध्‍ये त्‍यांच्‍या हैदराबाद व पुणे येथील कार्यालयांमधील संलग्‍न दान व स्‍वयंसेवी प्रयत्‍नांच्‍या माध्‍यमातून अनेक चॅरिटेबल उपक्रमांचा समावेश होता. मुले, महिला व तरूण सक्षमीकरण आणि समुदाय आरोग्‍य व शाश्‍वतेप्रती अनेक उपक्रमांव्‍यतिरिक्‍त हा उपक्रम एडीपी इंडियाच्‍या व्‍यापक सीएसआर धोरणाला अधिक दृढ करतो, ज्‍यामधून कॉर्पोरेट नागरिकत्‍व व सामाजिक विकासाप्रती कंपनीचे प्रयत्‍न अधिक प्रबळ होतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading