Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

विद्यार्थी विकास मंडळाचा वार्षिक पारितोषिक प्रदान व गौरव समारंभ उत्साहात

 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी विकास मंडळाचा ‘वार्षिक पारितोषिक प्रदान व गौरव समारंभ’ उत्साहात पार पडला. विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी विकास मंडळाद्वारे राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे विजेते तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारी महाविद्यालये / परिसंस्था आणि विद्यार्थी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर,  बागेश्री मंठाळकर, प्राचार्य (डॉ.) नितिन घोरपडे, डॉ. धोंडीराम पवार, प्रा. संदीप पालवे, अधिसभा सदस्य  प्रसेनजीत फडणवीस, डॉ. नीता मोहीते, डॉ. बाळासाहेब सागडे, रासेयो संचालक डॉ. सदानंद भोसले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाद्वारे महाविद्यालयीन व विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी किंवा विद्यार्थी संघांसाठी दरवर्षी नियतकालिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. तसेच मंडळाद्वारे महाविद्यालय वा विविध पातळ्यांवर विविध उपक्रम राबवत असतात. मंगळवारी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ वर्षीच्या नियतकालिक स्पर्धेच्या विजेत्यांचा, विद्यार्थी विकास मंडळाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या महाविद्यालय / परिसंस्थांचा आणि विविध उपक्रम यशस्वी व नाविन्यपूर्णतेने राबवणाऱ्या विद्यार्थी कल्याण अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही विभागातील विद्यापीठाशी सलग्नित असलेल्या ७० महाविद्यालयांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थी तसेच महाविद्यालय / परिस्थांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading