Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मिटकरी यांनी पक्षाध्यक्षांच्या संमतीशिवाय राजकीय भाष्य करू नये – सुनील तटकरे

मुंबई:  महायुतीत अजित पवार यांना सामावून घेण्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी आणि त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून व्यक्त होणारे प्रतिक्रिया, यामुळे महायुतीत बेपनाह वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. यांनी तर, अजित पवार यांना लक्ष करण्यात येत असेल तर वेगळा विचार करावा लागेल, असा टोकाचा इशारा भारतीय जनता पक्षाला दिला आहे. त्याची दखल घेऊन, मिटकरी यांनी पक्षाध्यक्षांच्या संमतीशिवाय राजकीय भाष्य करू नये, अशा सक्त सूचना केल्या असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. 

 नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी खालावल्यानंतर निकालाचे विश्लेषण करताना संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मध्ये अजित पवार यांना सोबत घेण्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या काही आमदारांनी देखील त्याचच री ओढत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे भाजपला कोणताही फायदा झाला नसल्याचे मत व्यक्त केले. 

 अर्थातच, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. अजित पवार यांच्यामुळे भाजपचे नुकसान झाले नाही. उलट मतदारांमध्ये भाजप बद्दल असलेल्या नाराजीचा फटका अजित पवार यांना सोसावा लागला, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आक्रमक नेत्या रूपाली पाटील यांनी व्यक्त केले. अमोल मिटकरी यांनी त्याच्याही पुढे जाऊन, वेगळा विचार करावा लागेल असा इशारा दिला. मात्र, राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना मतदारांसमोर युतीमध्ये बेपनाह असल्याचे चित्र उभे राहू नये यासाठी महायुतीतील तिन्ही घटक पक्षांचे नेते आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading